[इंग्रजीत आहे पण म्हत्वाचे वाटले......]
A huge amount. One lakh eighty-five thousand crores just in case some of you like me are numerically challenged. That's the size of Maharashtra's debt according to the latest Economic Survey Report for 2009-10 submitted by the minister of state for finance Vijay Vadattiwar to the legislative council. 30.70 per cent of the population of the state live below the poverty line - 3.2 per cent above the national average. In fact Maharashtra ranks third (right after Bihar and UP) in terms of the total population living below the poverty line. The numbers having grown by a whopping 12 lakh in the last one year alone!
That - according to Government of India's Ministry of Statistics and Programme Implementation - by the way only includes those with an income of Rs 540 a month! Last time I checked even the domestic help in most Mumbai homes was making far more... another garibi-nahi-hata-sakte-toh-garibon-ko-hatao ploy by our babu-neta brigade... but that's another debate.
While prices of essential goods and commodities have gone up by a minimum of 25 per cent... in many cases they have more than doubled says the report which adds that production of rice will be reduced by 8 per cent, corn by 10 per cent, ragi by 5 per cent, and oil seeds and sugarcane by 11 per cent. If you don't find that depressing enough the annual report also says that 45,000 small scale and 845 large industries shut shop in the year 2009-10 leading to 3,50,000 workers becoming unemployed.
Now look at the infrastructure in the state. Poor rainfall has meant that the dams and reservoirs are less than half their capacity for this time of the year. This means that the not only traditionally drought-hit areas in Marathwada and Vidarbha will be worse off but also other parts of Maharashtra. What this means to power production on the already power deficit state can only be anybody's guess. Caught in the grips of its worst agrarian crisis the water and power shortage will only add to the farmers' distress. This, at a time when the state still sees three farmers on an average committing suicide!
But these facts can be accessed by anyone who looks at Economic Survey Report which for the second consecutive year calls the financial condition of the Maharashtra "critical." I am only raising this issue because of the IPL. Yes you're right the IPL.
Barely two years ago, when Mukesh Ambani's Reliance Industries Ltd made the highest bid for an Indian Premier League franchise (Rs 441 crore for Mumbai), many termed it as a gamble on a risky concept. The IPL sure has come a long way in a short time, with the Sahara group on Sunday bidding Rs 1,702 crore for Pune and Rendezvous Sports World forking out Rs 1,533 crore for Kochi. In fact, these two bids, worth a total of about Rs 3,235 crore, add up to more than the Rs 2,853 crore collectively paid by the existing eight franchise owners in the first auction, on January 24, 2008. Does all this sound like the people involved in buying these teams are hard pressed for money? Will a couple of crores here or there make a difference to any of them? Methinks not.
But if you go by the Maharashtra's Cong-NCP government decision to not levy entertainment tax on the IPL matches it obviously thinks so. Agreed, Rs 12 crores would not write off all of Maharashtra's finance woes but at a time when it is actually finding it difficult to find funds for welfare schemes like scholarships for poor students and food-grains for anganwadis (which provide food to children in slums and tribal pockets to save them from malnutrition) every penny, or should we say crore counts.
The Delhi (where the Congress is in power) and Punjab governments have charged entertainment tax on IPL matches. They have maintained it's not just a sporting event but also a commercial and entertainment venture. An argument, the Maharashtra cabinet first supported.
Sources say Ashok Chavan under pressure from the NCP as Sharad Pawar is a keen supporter of the IPL. Just how keen you can gauge from the fact that when the Sena supremo Bal Thackeray expressed his unhappiness over Australian and Pakistani cricketers coming to Mumbai and asked his sainiks to stop them Sharad Pawar dropped everything to rush to Mumbai to assuage him. As a fellow Pawar who follows his moves very closely, I don't remember when farmer suicides, rising prices or any other issue ever moved the man who wears the twin hats of Union Agriculture Minister and Minister for Consumer Affairs, Food & Civil Supplies into such prompt action?
Asserting there was no pressure on Maharashtra government against imposition of entertainment tax on IPL matches in the state, Chief Minister Ashok Chavan had said on March 16th that the cabinet was mulling how much entertainment tax should be charged. "The cabinet is yet to decide on the quantum of tax and the final decision would be announced at an appropriate time," . Chavan had said, adding, "the matter is under consideration of the government."
He denied pressure on his government not to impose entertainment tax on IPL matches. To questions on public announcements by Finance Minister Sunil Tatkare (of the NCP) that the government had decided to waive off the entertainment tax, Chavan said the government had not levied the tax in the first place. "Where is the question of waiving it?" he asked. Yet this was something not brought up in the ensuing cabinet meeting for approval.
As a result none of the 14 matches being played in the state will get the state anything. This when Lalit Modi, IPL Commissioner himself has gone on record to say, "this issue is between the government and the franchisees. If they have to pay, they will pay."
पूर्ण येथे वाचा...!
Sunday, March 28, 2010
Saturday, March 27, 2010
मराठी एक पैलू : आपल्या मुलांना मराठी शिकवण्यात लाज कसली?
मराठीची ही हीनदीन अवस्था काही अचानक झालेली नाही. मराठीत शिकलेल्या लोकांचा आत्मविश्वास खचला म्हणून मराठीची आज अशी गत झालेली आहे. १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. आज आपण ज्या हिंदी भाषकांच्या नावाने बोटे मोडतो, त्या हिंदी भाषकांनी आजही संपूर्ण हिंदीत अभियांत्तिकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण मराठी लोकांना मात्र आपली भाषा ही ज्ञानभाषा होऊ शकत नाही असा साक्षात्कार झाला. ज्ञानभाषा होऊ न शकणारी भाषा मेली तरी मग रडायचे कारण काय? इंग्रजीत शिकलेल्या मराठी लोकांनी तरी काय असे अभूतपूर्व ज्ञान संपादन केले आहे? काय शोध लावले आहेत? ज्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात यश संपादन केले आहे ते सगळे आपल्या मातृभाषेत शिकल्यामुळेच यशस्वी झालेले आहेत. साहित्यक्षेत्रात इंग्रजी लिहिणाऱ्या लेखकांनीही इथल्या इंग्रजी न येणाऱ्या समूहांविषयीच लिहून नाव आणि पैसा कमावला आहे. म्हणजे स्थानिक भाषा बोलणारा समूह त्यांना केवळ कच्चा माल म्हणून हवा आहे.
स्वत:च्या भाषेविषयी तिरस्कार वाटणाऱ्या समाजात मराठी साहित्य संमेलन नावाची उधळपट्टी मात्र सुरू असते. आता मराठीच्या नावाने संमेलन भरवलेच आहे तर करू या चमचाभर चिंता मराठी भाषेची, म्हणून काही परिसंवादही होत असतात. मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया ! अशा या परिसंवादात थोडेसे जरा मराठीच्या बाजूने बोलले की लागलीच वक्ता 'इंग्रजीवरही आपण प्रभुत्व मिळविलेच पाहिजे' असे सांगून पापक्षालन करून टाकतो. जणू असे सांगितले नाही तर इंंग्रजी शाळा बंदच पडतील ! इंग्रजीविषयी पराकोटीचा न्यूनगंड असणे हे मराठी असण्याचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. अमेरिकेतील मराठी साहित्य संमेलनाचा वृत्तांत लिहिताना एका पत्रकार बाईंनी, 'मराठी लोकांनी आपली मुले मराठी शाळेत घातली पाहिजे, हा आग्रह आपण सोडून दिला पाहिजे' असे लिहिले होते. हे वाक्य मराठी असूनही मला अद्याप त्याचा अर्थ कळू शकलेला नाही ! मुळात असा आग्रह साहित्यिकांनी तर कधीच धरलेला नाही. साहित्य सहवासात राहणाऱ्या मराठी साहित्यिकांपैकी य. दि. व विंदा या दोघांचा अपवाद सोडला तर (बहुधा) कुणाचीच मुले मराठी शाळेत गेली नाहीत. मराठीच्या नावाने घरे मात्र लाटली ! साहित्यिकांना पैसा व प्रतिष्ठा यासाठी मराठीचा उमाळा येतो, राजकारण्यांना मतांसाठी मराठीच्या नावाने हुंदका येतो. साहित्यिक मराठीच्या नावाने गळा काढतात, तर राजकारणी दुसऱ्याचा गळा धरतात, दोघांची मुले मात्र जातात इंग्रजी शाळेत ! सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात इतके ढोंगी नेतृत्व मिळाल्यावर मराठीला बाहेरच्या मारेकऱ्यांची गरजच नाही ! (चला, एवढ्या एका बाबतीत तरी मराठी लोक आत्मनिर्भर आहेत.)
गेल्या पाच वर्षांपासून शासनाने मराठी शाळांवर बंदी घातलेली आहे. यासंबंधी नामवंत शिक्षणतज्ज्ञांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेधपत्रक काढले त्यावर एकाही साहित्यिकाची काहीही प्रतिक्रिया आली नाही. साहित्यिक तर सोडाच; पण एरवी घरच्या आमटीत जरा मीठ कमी-जास्त झाले तर वाचकांच्या पत्रव्यवहारात बाणेदारपणे पत्र लिहिणाऱ्या जागरूक नागरिकांपैकी कुणीही या विषयावर लिहायचे कष्ट घेतले नाहीत.
गेल्या वर्षी शाळांकडून मान्यतेसाठी अर्ज मागविताना शासनाने १५,००० रुपयांची खंडणी उकळली. इंग्रजी शाळांना मुक्त हस्ते परवानग्या दिल्या आणि मराठी शाळांना अनुदान द्यायला लागेल म्हणून अंगठा दाखवला. सर्व मराठी शाळांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत असे एक पत्र आले. अर्जासोबत हजारो मराठी शाळांनी भरलेले १५,००० रुपये मात्र एखाद्या खिसेकापूच्या सराईतपणे शिक्षण खात्याने हडप केले. या पैशातून आता दारूच्या कारखान्यांच्या उभारणीसाठी शासन अनुदान देणार आहे. सरकार दारूच्या करातून जमा केलेल्या पैशातून अनुदान देते म्हणून शाळांनी शासकीय अनुदान घेऊ नये अशी भूमिका महात्मा गांधीनी घेतली होती. दारूच्या कारखान्यांनी आजवर शिक्षणक्षेत्राला केलेल्या मदतीची शाळांकडून अशा रीतीने परतफेड करण्याची शासनाची ही नामांकित योजना आहे. याला अर्थातच मराठी साहित्यिकांचा पाठिबा असणे स्वाभाविक आहे, याचे कारण सर्वांना ठाऊकच आहे ! महात्मा गांधींच्या काळात विनाअनुदान शाळा चालविण्याचा तरी हक्क होता, आता मराठीत विनाअनुदान शाळा काढण्यासही शासनाची परवानगी नाही.
सालाबादप्रमाणे याही संमेलनात बेळगावविषयी ठराव होईल; पण महाराष्ट्रातील मराठीची दुर्दशा पाहता खरेतर बेळगाव कर्नाटकातच राहावे असा ठराव करायला हवा. तिथे निदान अल्पसंख्याकांची भाषा म्हणून तरी मराठी शाळांना काही घटनात्मक संरक्षण मिळेल आणि मराठी तग धरून राहील अशी आशा करता येईल ! बेळगाव महाराष्ट्रात आले की तेथील मराठीही लुप्त होऊन जाईल यात काहीच शंका राहू नये एवढे कर्तृत्व तरी महाराष्ट्र शासनाने नक्कीच सिद्ध केले आहे.
सलील कुलकर्णी, कौशल इनामदार यांच्या मराठी गाण्यांच्या मैफलींना तरुणांची गर्दी होते याविषयीच आपण समाधान मानून घेतो; पण या गर्दीचा अर्थ असा होतो की 'इंग्रजी शाळांमध्ये शिकलेल्या या मुलांनाही मराठी हीच आपल्या अभिव्यक्तीची भाषा वाटते.' ज्या शाळांमध्ये मधल्या सुटीत जरी मराठीत बोलले तरी शिक्षा होते असे आपण प्रौढीने सांगतो त्या शाळा मुलांची त्तिशंकू अवस्था करतात. ज्या भाषेत त्याला सहजपणे अभिव्यक्ती शक्य असते त्या भाषेविषयी तेथे तुच्छता शिकविली जाते आणि परक्या भाषेत अभिव्यक्ती शक्य होत नाही. ही त्तिशंकू पिढी काय साहित्य निर्मिती करणार?
इंटरनेटवर रसेल पीटर या भारतीय वंशाच्या पण कॅनडात राहणाऱ्या तरुणाचा स्टॅण्ड अप टॉक शो पहायला मिळतो. तो या कॉन्व्हेण्टमध्ये शिकलेल्या लोकांच्या भारतीय इंग्रजीवर दिसणाऱ्या प्रादेशिक हेलाची टर उडवत असतो. म्हणजे आपण कितीही साहेब व्हायचा प्रयत्न केला तरी आपले प्रादेशिक संस्कार प्रकट होतातच. यावर उपाय म्हणजे हे प्रादेशिक संस्कार घासून घासून घालविणे (मग त्यात आपली कातडी सोलली गेली तरी बेहत्तर !) किंवा इंग्रजीचा न्यूनगंड घालविणे. खरे म्हणजे इंग्रजी ही कामापुरती वापरायची भाषा आहे. तिचे फारतर कामचलाऊ ज्ञानसुद्धा पुरे आहे. त्यासाठी मुलांच्या अभिव्यक्तीवर बंधन घालून त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या पोरके करण्याची गरज नाही हे कुणाही शहाण्या माणसाला पटेल. अशा सांस्कृतिक पाया हरवलेल्या समाजात उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण होणार कसे?
मराठी माणसांची ही क्षुद्र मानसिकता जात नाही तोपर्यंत मराठीच्या वाट्याला अशी दुरवस्थाच येणार. 'इंग्रजीमुळे नोकऱ्या मिळतील' या भ्रमात सारे गटांगळ्या खात आहेत. खुद्द साहेबाच्या देशातही इसवीसन १६५१ पर्यंत इंग्रजी बोलली जात नव्हती. तेव्हा युरोपवर फ्रेंच भाषेचे वर्चस्व होते. शेवटी इंग्लंडच्या राजाला इंग्लंडमधील सर्व व्यवहार इंग्रजीतच होतील असा वटहुकूम काढावा लागला. त्यातून पुढे औद्योगिक क्रांती झाली व इंग्रज सर्व जगात पसरले. त्यांच्या विजिगिषू वृत्तीने त्यांनी जग जिंकले. आम्हाला साहेबाकडून काही घ्यायचे असेल तर ही विजिगिषू वृत्ती घ्यायला हवी. त्याऐवजी आपण त्यांची भाषा उरावर घेऊन बसलो आहोत. कुणाकडे काय मागावे हेही समजावे लागते. याविषयी एक मराठी बोधकथा सगून हे अरण्यरुदन थांबवितो.
एका गावात लक्ष्मीचे एक जागृतदेवस्थान होते. 'मागाल ते मिळेल' अशी ख्याती असल्याने तेथे भक्तांची गर्दी असे. एक दिवस एक गरीब माणूस बराच वेळ या रांगेत उभा राहून कंटाळला. त्याने पाहिले लक्ष्मीच्या शेजारीच अक्काबाईचे मंदिर आहे. त्यापुढे मात्र एकही माणूस दिसत नाही. तो सरळ त्या मंदिरात गेला. लोक त्याला हसले; पण काही दिवसांनी त्या माणसाची आर्थिक स्थिती पालटू लागली. पाहता पाहता तो श्रीमंत झाला. मग कुणाला तरी आठवले की तो तर शेजारच्या अक्काबाईच्या मंदिरात गेला होता. मग लोकही तेथे जाऊ लागले; पण त्या मंदिरात गेलेला माणूस काही दिवसातच भिकेला लागू लागला. लोक संतापले व त्यांनी त्या माणसाला याचे रहस्य काय आहे ते विचारले. तो माणूस म्हणाला, 'मला आधी हे सांगा की तुम्ही अक्काबाईच्या मंदिरात जाऊन काय मागितले?' लोक म्हणाले, 'देवी आमच्यावर कृपा कर असे म्हणालो, आणखी काय म्हणणार?' तो माणूस म्हणाला, 'मग बरोबर आहे. अरे मुर्खांनो अक्काबाई ही जरी लक्ष्मीची बहीण असली तरी तिचे कार्य लक्ष्मीच्या उलट असते. मी तिच्या देवळात जाऊन म्हणालो, बाई गं आजवर तू माझ्यावर खूप कृपा केलीस, आता तू माझ्या घरातून निघून जा ! अक्काबाई गेली की लक्ष्मी आलीच. तुम्ही अक्काबाईची कृपा मागितली तर मग भीक मागायचीच पाळी येणार ! कुणाकडे काय मागावे हेही समजावे लागते बाबांनो.'
आम्ही हा इंग्रजीच्या अक्काबाईचा फेरा मनोभावे पूजा करून मागितल्यावर आमच्या समाजाची अवस्था खालावणारच, आत्मविश्वास खचणारच. अर्थात ही कथा मराठीत असल्याने ती सांस्कृतिक वा राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी वाचली असणे शक्य नाही. त्यामुळे आमची अवनीतीकडे यशस्वी वाटचाल सुरूच राहील !!
- अरुण ठाकूर, नाशिक
साभार: लोकमत ( http://onlinenews1.lokmat.com/php/detailedsuppliment.php?id=Manthan-52-1-21-03-2010-de894&ndate=2010-03-21&editionname=manthan )
(विशेष आभार: सदर लेख इ-मेल द्वारे जगदीश म्हामने यांचे कडून मिलालेला आहे )
विषय
इंग्रजी,
मराठी साहित्य
Monday, March 22, 2010
अमोल सुरोशे(नांदापूरकर) यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
खूप प्रसंगांवर लिहिलंय आजपर्यंत. समाजकारण, राजकारण, तोडक-मोडक अर्थकारण वगैरे वगैरे. पण आज मात्र विशेष दिवस आणि विशेष लेख. आज राजेंचा (कॉलेज पासून अमोल राजेना बहुतांशी लोक 'राजे' च म्हणतात!) जन्म दिवस. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात रावसाहेबांची भूमिका करणारे म्हणून आम्ही आधी राजेंना ओळखायचो. तशी आधी भीतीच वाटायची (कुणालाही वाटेल, कारण त्यांनी रंगवलेले रावसाहेब हे निगेटिव पात्र! नाटक येथे बघता येईल).आधीच तर ते आमचे फर्स्ट ईयर आणि ते आमचे सीनियर! पण पुढे जेंव्हा शिवजयंतीच्या माध्यमातून भेट झाली तेंव्हा हे मृदू स्वरूपाच व्यक्तिमत्व थोड थोड कळायला लगल. न बोलनाराला बोलते कसे करायचे आणि अती बोलानाराना शांत कसे करायचे हे राजेंना खूप चांगले जमते.आणि एक आश्चर्य, मी तसा त्यांना जुनियर, अगदी २ वर्षे, पण अजून कधी राजे आम्हाला अरे तुरे नाही बोलले :-)!
छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा बाळगणारे राजे, निस्वार्थपणे प्रत्येक मित्राच्या मदतीला धावतात. त्यांच्यातल्या कार्यकर्त्याची जिद्द पाहून मला हुरूप येतो.जास्त दिवस जिजाऊ.कॉम चे काम बंद झाले की राजे हळूच म्हणतात, "राजे बस्स झाला आराम.......!"; आणि असा एकमेकांना प्रेरणा देत देत जिजाऊ.कॉम जवळपास पूर्ण होत आले!
माझ्या व्यक्तिगत आयुष्यात अमोल राजेंचा एक मार्गदर्शक आणि मित्र म्हणून असलेला वाटा अमूल्य आहेत!
या कार्यकर्त्याला आणि कवी मनाच्या मित्राला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आऊ जगदंबेच्या कृपेने, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने अमोल राजेंना खूप खूप आयुष्य आणि यश लाभो. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने अमोल राजेंकडून राष्ट्रसेवेत मोठ्ठ कार्य घडो. अशीच माझी आणि सर्व मित्रांची पांडुरंगाकडे प्रार्थना.
अमोल सुरोशे (नांदापूरकर) काही क्षणचित्रे.......!
राजे......! आम्ही हा फोटो मुद्दाम काढून घेतला होता रायगडावर होळी चौकात
राजे आणि मी तुळापुरात संभाजी महराजांच्या चरणाशी !
छत्रपतींच्या चरणापाशी
संभाजी महाराजांच्या चरणापाशी सर्व मावळे !
मित्रमंडळी!
मित्रमंडळी रायगडावर!
हे सुद्धा राजेच आहेत !
विषय
अमोल सुरोशे,
नांदापूरकर
Thursday, March 18, 2010
शिक्षण: एक छान संपादकीय
भारतात दिले जाणारे शिक्षण हे केवळ पदव्या देणारे कारखाने झाले असून, यापैकी बहुसंख्य कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या 'उत्पादना'चा दर्जा सामान्य आहे, याची जाणीव सरकारला झाली हे महत्त्वाचे आहे. केवळ परदेशांतील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यातही कम्प्युटर क्षेत्रातील कंपन्यांत भारतातून शिक्षण घेतलेल्या 'तंत्रज्ञां'चे वर्चस्व आहे, यातच अभिमान बाळगण्याइतका समाजातील अभिजन वर्गाचा बौद्धिक दर्जा खालावला आहे. साहजिकच या भारतीयांना मिळणारी 'लक्षावधी रुपयांची पॅकेजे' हा देशातील 'दजेर्दार शिक्षणा'चा पुरावा मानला जाऊ लागला आहे! त्यामुळे मूलभूत विज्ञान असो की सामाजिक शास्त्रे; त्यांतील मूलगामी संशोधनाच्या क्षेत्रात किती भारतीय तरुणांनी आपला ठसा उमटवला आहे, हा प्रश्ान्च कोणाला विचारावासा वाटत नाही.
........
मात्र नियमित परीक्षांव्यतिरिक्त चार लेखी घटक चाचण्या घेण्याच्या सरकारी आदेशामुळे, जवळपास दर महिन्याला मुलांना परीक्षेच्या दडपणातून जावे लागत होते. शिक्षक भारती या संघटनेने या चाचण्यांचे स्वरूप बदलावे यासाठी पाठपुरावा चालविला होता. त्याला यश येऊन, १५ मार्चला सरकारी परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार आता मुख्याध्यापकांच्या सल्ल्याने शिक्षकांना तोंडी, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट, निबंध वा तत्सम पद्धत चाचणीसाठी अवलंबता येईल. आता असा दावा केला जात आहे की, २००४ साली घेतलेल्या निर्णयातच घटक चाचणीचे स्वरूप शिक्षकांनी ठरवावे, असे अभिप्रेत होते. पण परिपत्रकातील शब्दयोजनेतून तसे स्पष्ट होत नव्हते असा मुख्याध्यापकांचा दावा आहे. या परिपत्रकाला जे अभिप्रेत होते, ते स्पष्ट करणारे दुसरे परिपत्रक काढण्यास शिक्षण विभागाला सहा वषेर् लागली, यावरून शिक्षणाचे नियंत्रण हे नर्मदेतील गोट्यांच्या हातात कसे आहे हेच सिद्ध होते. शिक्षकी पेशात सध्या वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये घटक चाचण्या दडपणमुक्त करण्याची 'कल्पकता' कोण निर्माण करणार, हा मोठाच प्रश्ान् आहे. मुलांसाठी शिक्षण आनंददायी करण्याची कुवत आणि इच्छा असलेले शिक्षकही शोधावेच लागतील. तेव्हा हे आव्हानही आता शिक्षकांच्या संघटनांनी स्वीकारावे!
पूर्ण येथे वाचा
सौजन्य: महाराष्ट्र टाइम्स
Sunday, March 14, 2010
राजा शंभू छत्रपती !!!! पुण्यतिथी १५ मार्च
शंभू राजांना मानाचा मुजरा !!!!
ईतिहासकारांनी दुर्लक्षलिले, थोरल्या छत्रपतींच्या राजकारणातील अतर्क्य खेळ्या व जबाबदार्या वयाच्या ८व्या वर्षापासुन शंभर टक्के यशस्वी करणारे, आप्तांच्या रोशाला फशी पडलेले आणि पराक्रमासोबत कवित्वाचे बहुमोल लेणे घेऊन जन्माला आलेल्या त्या महान योध्याचा जीवनपट। थोरल्या महाराजांच्या अवकाळी मृत्युनंतर घरातील भेदी, स्वकीय शत्रु आणि औरंग्याचे आक्रमण ह्या तीनही आघाडींवर हा रुद्र अविरत लढला. उण्यापुर्या ८ वर्षाच्या राजेपणात त्यांनी स्वराज्य दुपटीने वाढविले, रक्षिले, पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच त्यांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते. मात्र केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला. पापी औरंग्याने शिवाजी राजांपासुनच्या पराभवाचे उट्टे काढत या नरशार्दुलाचे अविरत हाल केले, कल्पनातीत अत्याचार केले आणी शेवटी वधु-तुळापुर येथे तुकडे-तुकडे करुन मारुन टाकले. या सर्व प्रवासात त्यांच्या साथीला होते, छंदोगामात्य कवी कलश. त्यांचेही बलिदान ईतिहासकारांनी दुर्लक्षिले. शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !! बापाने घडवल्या मुलुखाला पुढे रेटाया आज युवराज धड़कला | सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी , सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !! माथी संकट नसे , तो कोण भोसला सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला | युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला कळन्याअधिच आईचा पदर सरला !! धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला , शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला | एक समयी पाच मिहिमा लढला होता , मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !! रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत , मांवळचा हा वाघ लढत होता | औरंग्याची गुर्मी उतरवत , शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!! गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता , पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता | सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !! डोळे फोडले , मीठ चोळले , तरी राजा डगमगत नव्हता | कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर , त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!! पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता , म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता | शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला मरता मरताही भगवा कवटाळत , शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!! कार्यकर्ते जिजाऊ.कॉम .... (साभार :- श्याम वाढ़ेकर) टिप : राजे संभाजी आणि क्षेत्र तुळापुर या बद्दल अधिक माहित इथे वाचा |
विषय
sambhaji maharaj,
tulapur,
संभाजी महाराज
Tuesday, March 9, 2010
प्रवास: कार्यकर्ता ते मुख्यमंत्री कार्यकर्ता !
सदर पोस्ट ही आमच्या ह्या ब्लॉग बद्दल आहे. या ब्लॉगने आम्हाला विचार करायला शिकवले खूप काही छोटे मोठे अनुभव दिले. आपल्याच लिखाणातून आपल्यावर कसे चांगले संस्कार होऊ शकतात याचे आम्ही दोघे म्हणजे अमोल सुरोशे आणि मी ज्वलंत उदाहरण. विचार, लिखाण आणि भाषणे तसं आधी पासूनच करत, पण कधी इतक्या पब्लिक फोरमवर लिहिले नव्हते. २००७ साली शेवटी शेवटी हा ब्लॉग सुरु केला. ब्लॉग साठी नाव शोधत होतो- 'कार्यकर्ता'. कारण नांदेडला असताना बरेचजन कार्यकर्ता म्हणून बोलावत. कॉलेज मध्ये शिवजयंती, भीम जयंती, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रज्ञा असे काही उपक्रम करत म्हणून! शिवजयंतीचा वारसा मला अमोल कडूनच मिळाला. अमोला आम्ही सगळे राजे म्हणत आणि आज ही त्याच नावाने बोलावतो. आम्ही तिथूनच समविचारी! तसं 'कार्यकर्ता' ही टर्म मला फार आवडायची. एकदा माझ्या मित्राला, विशाल चौहानला, मनवत मध्ये म्हंटला सुद्धा कि मला एक 'कार्यकर्ता' नावाचं मासिक काढायचं (;-)). कारण अस वाटायचं- की सगळे जे राष्ट्रनिर्मिती साठी झटले ते सगळे कार्यकर्तेच. आणि अशा कार्यकर्त्यांचा आपण समजा समोर, युवकांसमोर आदर्श ठेवायला हवा आणि एक कार्यकर्ता निर्मितीचे मध्यम व्हयला हवे. लीडरशिप तर सगळेच शिकवतात पण कार्यकर्तेपण कुणीच नाही! आणि सगळेच नेते होवून करणार काय? असो! तर मग मला ब्लोगस्पॉट कडून 'कार्यकर्ता' हे नाव मिळाले नाही. आता मात्र थोडा हिरमुसलो. मग पुन्हा थोडा लहानपनाकडे गेलो, मित्रांसोबत केलेल्या चर्चा आठवल्या आणि पुन्हा लक्षात आला की प्रत्येक जन कार्यकर्ता असतोच, मग तो नेता का असेना. पण आजकाल तो आपाल्यातील कार्यकर्तापण हरवतो आणि म्हणून संघटनांचा ह्रास होतो आणि राष्ट्रानिर्मितीत बाधा येते. मग 'मुख्यमंत्री' हा शब्द समोर आला. त्याला ही विचारांचा पाठींबा. कारण लहान पाणी वाटायचे सगळेच प्रश्न मुख्यमंत्री सोडवू शकतो. मग मुख्यमंत्रीच का नको. आणि शेवटी 'मुख्यमंत्री' हे नाव (युआरएल) मिळाले.[आता गुगलनेच आम्हाला मुख्यमंत्री करायचे ठरवल्यावर आम्ही तरी का नको म्हणायचे :-) ]. एकंदर ब्लॉग सुरु झाला. वेब २.० मध्ये आमचा यशस्वी प्रवेश [या पूर्वी काही ब्लॉग होते पण चालत नव्हते :-(] आणि एका लोकशाही माध्यमाचे आम्ही भागीदार झालो!
पहिली पोस्ट टाकली (थोडीशी मस्करी भाषेत) पण मनातली खरी तळमळ बाहेर आली. आणि ब्लॉगला पहिली कॉमेंट अमोल राजेंची! (तेंव्हा चुकून ही वाटले नाही की हा प्रवास इतका लांब असणार!) काही लोकांनी याच्या प्रिंट काढून वाचल्या! छान प्रतिसाद पहिल्याच पोस्ट ला!
पुढे २००८ लाच अमोल राजे ब्लॉगवर पूर्ण सक्रीय झाले.
ब्लॉगचे जुने हेडर असे होते. [हात दाखवत आहेत ते अमोल राजे (रायगडावरील होळी चौकात उभे आहेत) आणि घडी घालून तो मी. मागे विधान भवन ;-)]
पुढे विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्या रंगल्या. श्याम वाढेकर, मयूर चिटणीस, सुधाकर पाटील, प्रशांत मिसळ, सुदर्शन जगदाळे असे अनेक मित्र या ब्लॉगवरील राजकीय आणि सामाजिक विषयावरील चर्चांवर भाग घेत होते. आणि वाचक वर्ग ही फार होता त्यांना आणि अजूनही आहे (गुगल सांगतेच ते!). मग तेंव्हा कळाले अरे सगळ्यांना एकच वाटतेय पण बोलायचे कुठे आणि कोण बोलू देणार? हे प्रश्न. पण कुणी तरी बोलायला सुरवात केली की मग सगळेच बोलायला लागतात. त्यामुळे आधी काहीच न करण्यापेक्षा कमीत कमी बोलला तरी पाहिजे. कारण वैचारिक बैठक होते आणि प्रगल्भता येते. प्रश्नांचे मूळ कळते. आणि सरळ काही तरी करायलाच लागत असाल तर ते खूपच चांगले. पण जे करत आहात ते सुद्धा बोलायलाच पाहिजे [पण म्हणून फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी होऊ नये]. आमच्या सगळ्या तरुण मित्रांना एक अनुभवाची शिकवण सांगतो. जे वाटते ते बोला, कारण त्यानेच तुमचे अस्तित्व दिसून येते, कळून येते. कारण एक दिवस मी काही तरी करेल की जगच बदलेल अस म्हणत वाट पाहत बघण्यात काहीच अर्थ नाही. खूप उशीर झालेला असतो! समाज तो पर्यंत तुमच्या अस्तित्वाला नाकारून आपले वैचारिक संस्कार येणाऱ्या समाज मनावर करून मोकळा झालेला असतो. म्हणून बोला आणि लिहा. अमोल नेहमीच म्हणतो 'मागची पिढी वर्तमानपत्र वाचून घडली, ही आणि या पुढच्या पिढ्या नेट सर्फ करून घडतील'. खरं लोकशाही-स्वातंत्र्य मिळवण्याच एक मध्यम म्हणून इंटरनेटचा उपयोग व्हायला हवा. समानता आणि निरपेक्ष माहितीच मध्यम म्हणून या माध्यमाचा उपयोग व्हायला हवा. वेब २.० च तेच उदेष्य. खरी लोकशाही ती इथेच. विकीपेडिया आणि तत्सम माहिती माध्यमात निरपेक्ष माहिती असण्याची शक्यता असते कारण तिच्यावर हजारो लोकांच्या नजरा असतात (ओपन सोर्सचा हाच फायदा) आणि ती सार्वजनिक मालमत्ते सारखी असते. तुम्हाला ती ताकद दिली गेलेली आहे तिचा पूर्ण उपयोग करा नसता उद्या तुमच्या मुलाने काही गुगल सर्च केले आणि त्याला काही चूक माहिती मिळाली तर त्याचे खरे जबाबदार तुम्हीच! तुमचा इतिहासच उद्या तुमच्या वेब वर नसल्याने चुकीचा मांडला गेला तर आश्चर्य करू नका! म्हणून बोला आणि वेब वर रहा! आज मराठी मुद्दा या विषयावर इंग्रजीत शोधा जास्त अँटी मराठी मिळेल. कारण मराठी माणूस इंटरनेट वर तुलनेने कमी आहे. (आता उगाच कुणी यावर वाद करू नये). कारण एक निरीक्षण केलय मी, 'मराठी माणूस आपल्या न्युनगंडाला अहंगंडाचे पांघरून घालून गोंजारतो'. असो. तर राजकीय-सामाजिक(२०-८०) विषय चर्चिले गेले आणि ब्लॉग थोडा नियमित लिहिला जाऊ लागला.
अमोल ने मागील वर्षी ब्लॉगला खूप समर्पक रूप दिले. ब्लॉगची थीम आणि हेडर सगळेच त्याच्या विचार सारणी ला साजेशे झाले; ब्लॉगचे नाव 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' आणि तो प्रतिक सत्तेतील सामान्य माणसाचा असे. म्हणजेच "मुख्यमंत्री कार्यकर्ता- एक सामान्य माणूस सामान्य माणसाकरिता". हेडर मधील आर. के. लक्ष्मण काकांचा कॉमन मॅन, आधी विचार करताना, मग चालताना आणि मग रूपाच बदलून राष्ट्राच प्रतिक होवून धावतांना, ब्लॉगच्या ध्येयाचे पूर्ण चित्रीकरण करतो. अमोल राजेंच्या ह्या कल्पकतेला त्रिवार प्रणाम [:-)]! शेवटी हा ब्लॉग एक नवे स्वरूप घेवून तयार झाला.
आता अमोल आणि मी, दोघे ही, वेळ मिळेल तेंव्हा काही ना काही लिहित असतो. ब्लॉग लिहायचा म्हंटल की संध्याकाळची वेळ हीच चांगली आणि शनीवार रवीवार ही चांगला वापरता येतो. आता आम्ही दोघांनी जिजाऊ.कॉम ही सुरु केले आहे. ते ही चालवण्यात आणि मेंटेन करण्यात शनिवार रविवार जातो. या सगळ्यात खूप जणांचे सहकार्य लाभले आणि पाठीवर खूप जणांची शबासकी ही पडली. बर वाटतं! मधेच आम्ही पाहुणे ब्लॉगर हा प्रकार सुरु करून सुधाकर पाटील, श्याम वाढेकर आणि रवींद्र पवार यांना ब्लॉगवर आमंत्रित केले, आणि त्यांच्या लिखाणाला ही खूप प्रतिसाद मिळाला. रोहन पाटील ह्यांच्या नटरंग आणि झेंडा ह्या रीव्हीवला मिळालेला प्रतिसाद तर खूप प्रचंड आहे. आता ई -कार्यकर्ता या नावाने एक अनियतकालिक ही काढत आहोत त्याचा दुसरा अंक इथे मिळेल.
प्रवास खूप झालाय, अनुभव ही खूप आलेत. अजून खूप काही गाठायचय आणि लिहायचय.
वाचकांचा असाच प्रतिसाद मिळत राहो आणि आमच्या लिखाणाच निर्मितीमूल्य वाढत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. शेवटी वाचकांना ही विनंती- काही करा/बोला, कुठे ही करा/बोला पण काही तरी करा/बोला (चांगल)!
आमचे प्रयत्न तर चालूच आहेत आणि असणार आहेत कारण, आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो!
जय महाराष्ट्र!
Sunday, March 7, 2010
८ मार्च, जागतिक महिला दिनानिमित्य हार्दिक शुभेच्छा,
इतिहासातील पहिले स्त्री व्यक्तिमत्व जिने स्वतंत्र आणि स्वाभिमानी स्वराज्यचे स्वप्न पहिले, या देशातील पहिली सहकारी बँक ज्यांनी काढली त्या जिजाऊ माँ साहेबांच्या लेकीना , या देशातील साक्षात सरस्वती, शिक्षणाची गंगा जिने भारतीय स्त्रीच्या दारी पोचवली आशा त्या सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मुख्यमंत्री ब्लॉग.
मुख्यमंत्री ब्लॉग.
Thursday, March 4, 2010
कृषी बाजारभाव, ग्रामीण युवक, आय ए एस/ आयपीएस / आय एफ एस, नौकरी
जिजाऊ.कॉम वरील काही अपडेट
रोज कृषी बाजारभाव पहा: http://www.jijau.com/rastra-nirmana/-siksana-ani-rojagara/krushiyantrikikaran/krushibajarbhav
ग्रामीण युवकांनो स्थापन करा बाजार माहिती केंद्र: http://www.jijau.com/rastra-nirmana/-siksana-ani-rojagara/krushiyantrikikaran/krushimandal/bajara-mahiti-kendra
आय ए एस/ आयपीएस / आय एफ एस इ. नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण माहिती :
http://www.jijau.com/spardha-pariksha
नौकरी सेक्शन:
रेल्वे भरती मंडळात २६१२ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे कमर्शियल क्लार्क (१२०३ जागा), अकाउंट क्लार्क (१८२ जागा), तिकिट निरीक्षक/तिकिट कलेक्टर (८२३ जागा), ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट (३०९ जागा), ट्रेन क्लार्क (९५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राजस्थान फ्रंटियर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये १० जागा
राजस्थान फ्रंटियर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे.
चांदा येथील संरक्षण उत्पादन विभागात शिक्षकांच्या ३ जागा
चांदा येथील संरक्षण उत्पादन विभागात पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज २१ दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे.
एनटीपीसीमध्ये ४३८ जागा
एनटीपीसी या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी- मेकॉनिकल (१६२ जागा), इलेक्ट्रिकल (११० जागा), कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन (५८ जागा), सिव्हिल (४८ जागा), फायनान्स (४० जागा), ह्यूमन रिसोर्स (२० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://www.ntpccareers.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती
ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये सिनिअर अकाऊंटस ऑफिसर, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आदी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१० आहे. अधिक माहिती www.oil-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळात १२ जागा
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळात मुख्य व्यवस्थापक (कमर्शियल) (१२ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), उप व्यवस्थापक (४ जागा), अधिक्षक (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.nhdcltd.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जळगाव महापालिकेत ५३ जागा
जळगाव महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानात कर्णदोष विशेष शिक्षक (६ जागा), दृष्टिदोष विशेष शिक्षक (५ जागा), मतिमंद विशेष शिक्षक (१४ जागा), बहुविकलांग विशेष शिक्षक/सेरेब्रल पाल्सी विशेष शिक्षक (२ जागा), श्रवण भाषा वाचा तज्ज्ञ (६ जागा), व्यवसाय मार्गदर्शक (४ जागा), भौतिकोपचार तज्ज्ञ (७ जागा), व्यवसायोपचार तज्ज्ञ (९ जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती द. ६ मार्च २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पायलटच्या ३ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पायलट (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ८ मार्च २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
डेक्कन ग्रामीण बँकेत १३० जागा
डेक्कन ग्रामीण बँकेत लिपिक-नि-रोखपाल (१३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये २२ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये करार तत्त्वावर अनुभवी अभियंता (२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.bhel.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ५ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती ६ मार्च २०१० होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. डीएनएमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहायक आयुक्ताच्या ३ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहायक आयुक्त (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशनमध्ये ३० जागा
चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये रिफायनरी ऑपरेटर (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
रेल्वे भरती मंडळात जागा १६५३ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे सहायक स्टेशन मास्तर (१६२९ जागा), ट्रफिक असिस्टंट (२४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
एनटीपीसीमध्ये अपंगांसाठी १७ जागा
एनटीपीसीमध्ये अपंगांसाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स इंजिनिअर (१७ जागा), पब्लिक रिलेशन (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://ntpc.timesjobs.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ३९ जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर (६ जागा), असोसिएट प्रोफेसर (१६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रोज कृषी बाजारभाव पहा: http://www.jijau.com/rastra-nirmana/-siksana-ani-rojagara/krushiyantrikikaran/krushibajarbhav
ग्रामीण युवकांनो स्थापन करा बाजार माहिती केंद्र: http://www.jijau.com/rastra-nirmana/-siksana-ani-rojagara/krushiyantrikikaran/krushimandal/bajara-mahiti-kendra
आय ए एस/ आयपीएस / आय एफ एस इ. नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण माहिती :
http://www.jijau.com/spardha-pariksha
नौकरी सेक्शन:
रेल्वे भरती मंडळात २६१२ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे कमर्शियल क्लार्क (१२०३ जागा), अकाउंट क्लार्क (१८२ जागा), तिकिट निरीक्षक/तिकिट कलेक्टर (८२३ जागा), ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट (३०९ जागा), ट्रेन क्लार्क (९५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राजस्थान फ्रंटियर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये १० जागा
राजस्थान फ्रंटियर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे.
चांदा येथील संरक्षण उत्पादन विभागात शिक्षकांच्या ३ जागा
चांदा येथील संरक्षण उत्पादन विभागात पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज २१ दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ फेब्रुवारी -५ मार्च २०१० या अंकात आली आहे.
एनटीपीसीमध्ये ४३८ जागा
एनटीपीसी या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी- मेकॉनिकल (१६२ जागा), इलेक्ट्रिकल (११० जागा), कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन (५८ जागा), सिव्हिल (४८ जागा), फायनान्स (४० जागा), ह्यूमन रिसोर्स (२० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://www.ntpccareers.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती
ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये सिनिअर अकाऊंटस ऑफिसर, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आदी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१० आहे. अधिक माहिती www.oil-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळात १२ जागा
राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळात मुख्य व्यवस्थापक (कमर्शियल) (१२ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), उप व्यवस्थापक (४ जागा), अधिक्षक (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.nhdcltd.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जळगाव महापालिकेत ५३ जागा
जळगाव महानगरपालिकेत सर्व शिक्षा अभियानात कर्णदोष विशेष शिक्षक (६ जागा), दृष्टिदोष विशेष शिक्षक (५ जागा), मतिमंद विशेष शिक्षक (१४ जागा), बहुविकलांग विशेष शिक्षक/सेरेब्रल पाल्सी विशेष शिक्षक (२ जागा), श्रवण भाषा वाचा तज्ज्ञ (६ जागा), व्यवसाय मार्गदर्शक (४ जागा), भौतिकोपचार तज्ज्ञ (७ जागा), व्यवसायोपचार तज्ज्ञ (९ जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती द. ६ मार्च २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पायलटच्या ३ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पायलट (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ८ मार्च २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
डेक्कन ग्रामीण बँकेत १३० जागा
डेक्कन ग्रामीण बँकेत लिपिक-नि-रोखपाल (१३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये २२ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये करार तत्त्वावर अनुभवी अभियंता (२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.bhel.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ५ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती ६ मार्च २०१० होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. डीएनएमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहायक आयुक्ताच्या ३ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सहायक आयुक्त (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशनमध्ये ३० जागा
चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये रिफायनरी ऑपरेटर (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
रेल्वे भरती मंडळात जागा १६५३ जागा
रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे सहायक स्टेशन मास्तर (१६२९ जागा), ट्रफिक असिस्टंट (२४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
एनटीपीसीमध्ये अपंगांसाठी १७ जागा
एनटीपीसीमध्ये अपंगांसाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स इंजिनिअर (१७ जागा), पब्लिक रिलेशन (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://ntpc.timesjobs.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ३९ जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रोफेसर (६ जागा), असोसिएट प्रोफेसर (१६ जागा), असिस्टंट प्रोफेसर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.