Thursday, February 11, 2010

ई - कार्यकर्ता अंक २ रा

ई - कार्यकर्ता अंक २ रा प्रसिद्ध झालेला आहे .
येथे डाउनलोड करावा !

                                      कार्यकर्ता उवाच !

जय महाराष्ट्र,

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, टिळक अशा आणि अनेक महापुरुषांनी संस्कार केलेल्या महाराष्ट्राच्या मातीलाकपाळी भाळून हा छोटासा अंक आपल्या समोर आणत आहोत. हा अंक म्हणजे आपल्यापैकीच काही लोकांच्या/तरुणांच्या मनात चालेल द्वंद, समाज का बदलू शकत नाही? हा पडलेला प्रश्न आणि बदल घडवण्याची इच्छा शक्ती हे सगळ मांडण्यासाठी एक व्यासपीठ आहे आणि असेल. बदल नक्कीच घाडूशकतो, पण तो घडवावा लागतो! म्हणजे आपल्याला प्रयत्न करावे लागतात! लोक म्हणतात, "काही तरी करून दाखवा, फक्त लिहू आणि बोलू नका!" आपल्या पैकी बर्याच तरुणांना हा अनुभव आला असेल; कारण आपल्यात चीड असते आणि आपण शोधात असतो नेमक काय करता येईल, मग आपल्याला काही तरी अर्ध सापडत, आपण ते मांडतो आणि लोक (ज्यातले बरेच खर तर काहीच करत नाहीत!) त्याला विरोध करतात आणि तो विरोध म्हणजेच त्याचं हे वाक्य "काही तरी करून दाखवा फक्त लिहू आणि बोलू नका!" या विरोधातून जे तरले ते बदलाकडे एक पाऊल नक्कीच पुढे जातात. पुढे ही खूप संघर्ष असतो; पण, सुरवात तर झालेली असते ना! त्यामुळे काही तरी बदलण्यासाठी काही तरी करत राहूत, शिकत राहूत, बोलत राहूत, नाव ठेवनारांना ओरडू द्या की काय ओरडायचे ते! पण कधी न कधी आपल्याला विचारांना क्रियेचे स्वरूप दिल्याशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी वाटेल, 'THIS IS IT'! तिथे नक्कीच थांबूत आणि करूत! पण डोक्याला गंज चढू नये म्हणून, आधी वैचारिक बैठक नीट बसावी म्हणून खूप काही गोष्टींचा उहा पोह करावा लागेल. गौतम बुद्ध सांगतात तस प्रत्येक नियमाला आपल्या मापात एकदा टाकून बघाव लागेल! तेंव्हाच तर खरा 'कार्यकर्ता' जो Agent Of Change असेल, बनू शकतो!
हा अंक किती नियमित असेल माहित नाही [हा अंक २ रा], जमेल तस आणि जमेल तेंव्हा प्रकाशित करत राहूत. तुमचा ही सहभाग यात अपेक्षित आहे. तुमच्या कडून काही लेख कविता आल्या तर खूपचछान किंवा कधी तुम्हाला वाटलं की या वेळेस आपण काढावा "कार्यकर्ता" तर नक्की सांगा! निघेल तेंव्हा हा अंक तुमच्या इनबॉक्स मध्ये पोहचावा म्हणून कृपया इथे [sub-newsletter@jijau.com] एक एमैल पाठवा. काही सूचना असतील तर त्या ही पाठवा. शेवटी ही चळवळ सगळ्यांची आहे, फक्त आणि फक्त राष्ट्र निर्माणासाठी!

आपलेच मित्र,

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे
[या अंकाला Twitter वर follow करा: http://twitter.com/karyakarta]




 

No comments:

Post a Comment