आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि संपूर्ण भारत देशाला दिलेल्या चित्रपट सृष्टीची कर्मभूमी आणि या क्षेत्राची पंढरी असलेल्या आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेची आणि मराठी चित्रपटांची चाललेली दुर्दशा खरच खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. गेल्या काही वर्षात अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलेले काही मराठी चित्रपट आपल्याच भूमीमध्ये सपशेल अयशस्वी ठरले आहेत, आमच्या प्रेक्षकांनी या सर्व चित्रपटांकडे अक्षरशः पाठ फिरवली.
याच अनुशंघाने "गाभ्रीचा पाऊस" चे निर्माते प्रशांत पेठे यांनी व्ही शांताराम पुरस्कार सोहळ्यामध्ये आपले भावनिक उद्गार काढले, सबंध जगात या चित्रपटाने शाबासकी मिळवली असतांना महाराष्ट्र मध्ये ह्या चित्रपटाला प्रदर्शित करायला सिनेमागृहे देखील मिळाले नाही , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असलेला हा सिनेमा महाराष्ट्र सारख्या राज्यात पोहोचू शकला नाही आणि हे बोलतांना त्यांचे डोळे पाण्याने ओलावले होते. करोडो रुपयांचे नुकसान सहन करून देखील काही तरुण दिग्दर्शक काही नवीन कल्पना घेऊन विविध विषयांवर काही चित्रपट बनवत आहेत आणि आम्ही मात्र त्या चित्रपटांच्या सीडी (ते हि डुप्लीकेट ) ची वाट बघतो, पण आपण हे सहज पाने विसरतो कि हा चित्रपट बनवतांना सर्व कलाकारांनी घेतलेली मेहनत त्यावर खर्च होणारा पैसा. आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार कराल अन्यथा चांगले सिनेमे काढण्याची हिम्मत कोणी करणार नाही. आणि आमच्या महाराष्ट्राची परंपरा हि नेहमी चांगल्याच्या पाठीशी राहण्याची राहिलेली आहे.
आपण सर्व मिळून मराठी सिनेमा आणि चांगल्या कलाकृतींसाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, मराठी सिनेमा हा आवडतो पण आम्हाला तो कधी आला हेच काळात नाही, तर आपण सर्वांनी या बाबत कायम जागृत राहिले पाहिजे. चांगल्या विषयाचा मराठी सिनेमा सबंध महाराष्ट्रभर पोचलाच पाहिजे .. तेव्हाच आपल्या मराठी सिने सृष्टी ला परत एकदा ते सोन्याचे दिवस येतील ...
मराठी सिनेमा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मुख्यमंत्री ब्लॉग ने आता कंबर कसली आहे, आपण हि या साठी नेहमी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा करतो
येत्या जानेवारी मध्ये काही खास चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत, त्या साठी काही खास आपल्या सर्वांसाठी ...
दिनांक जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे ,

दिनांक ८ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे



तसेच अजुन एक चित्रपट
दिनांक १ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे ,






तसेच २२ जानेवारीला येत आहे


आपण सर्व हे मराठी चित्रपट चित्रपट गृहा मधेच जाऊन बघावे आणि आपली संस्कृती आपणच वाढवावी.
आपलाच
अमोल सुरोशे ... जय महाराष्ट्र !!!
5 comments:
वाह. मस्त पोस्ट आहे. नक्की पाहणार व इतरांना सांगणार.
मोलाची माहिती दिलीत. मी मराठी सिनेमा आर्वजुन पाहतो आणि ते पण थिएटर मध्ये जाऊन.
-अजय
मराठी सिनेमा प्रदर्शित करने हे प्रतेक multiplex मधे सक्तीचे करण्याचा निर्णय सरकारने घेतला काय?
मराठी सिनेमा जेव्हा कुठला एखादा पुरस्कार मिलावातो तेव्हाच त्याची ओळख होते .हिंदी सिनेमा छे फालतू सिनेमा सुदा प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वाना माहित होतात..marketing करायला हवी जाशी में छत्रपति शिवाजी राजे बोलतोय अणि जेंडा ची केलि गेली.... सिनेमा हा फ़क्त सिनेमा गृहताच पाहून नव्या उमेदीच्या मराठी कलाकाराना प्रोत्साहन दया...दर्जेदार मराठी सिनेमा,नाटके,पुस्तके याना पहिली पसंती देऊन आली संकृतिजपा..
पुढील वर्ष जोरात आहे तर
'झेंडा' ची आतुरतेने वाट पाहत आहे
झेंडा आणि हरीश्चंद्राची फॅक्टरी, आतुरतेने वाट पाहत आहे...
Post a Comment