जीवन मरणाच्या प्रश्नावर बोलण्या एवढा मी नक्कीच मोठे नाहीये, पण एक प्रश्न मनामध्ये सतत येत होता आणि तो या निमित्त्याने इथे व्यक्त करू इच्छितो.
सध्या "इच्छामरण" किंवा "दयामरण" या विषयांवर प्रसार माध्यमांच्या द्वारे भरपूर चर्चा होतांना दिसते आहे, कारण आहे ते अरुणा शानबाग यामहिलेचे ..
अरुणा शानबाग.. या महिलेची करून कहाणी ऐकून नक्कीच सर्वांचे मन हेलावून जाईल .. आणि माझे हि हेलावले.
अरुणा ह्या मुंबई मधील केइएम हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कामाला होत्या त्या वेळी त्यांच्या वर झालेल्या अति प्रसंगामुळे त्यांना जबर मानसिक आणि शाररीक धक्का बसला .. ज्या धक्क्यातून त्या गेल्या ३६ वर्षे सावरलेल्या नाहीत. गेली ३६ वर्षे त्या कोमा मध्ये आहेत, श्वास चालू आहेत .. पण जीव कधीच निघून गेलाय.. ३६ वर्षे झाले त्यांना या हॉस्पिटल मध्ये सांभाळले जाते, जबरीने त्यांना जेवण खाऊ घालावे लागते, त्यांची हि करून अवस्था बघून त्यांच्या वर एक पुस्तक लिहिणाऱ्या महिला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक दयामारणाची याचिका दाखल केलीये. या निमित्त्याने काही प्रश्न आपल्या समाजासमोर आले आहेत ज्याचे उत्तर शोधणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे..
अरुणा वर अति प्रसंग करणार्याला ७ वर्षे शिक्षा होऊन तो सुटला देखील पण जिच्यावर हा अत्याचार झाला ती मात्र गेली ३६ वर्षे ह्या मरणप्राय वेदना सहन करून आपले जीवन जगात आहे, मग मला सांगा.. इथे कुठला न्याय झाला? .. ज्या व्यक्तीने अपराध केला त्या हि पेक्षा हि भयानक शिक्षा जिच्यावर हा अन्याय झाला तिलाच भेटली. आज हि तिच्या पुढील जीवनात काही सुधारणा होण्याची कसलीही शक्यता नाहीये.. आज त्यांचे वय ६२ वर्षे आहे, गेली ३६ वर्षे त्यांचे जीवन कसे असेल ह्याचइ आपण कल्पना न केलेली बरी .. म्हणून त्यांच्या सुखांतासाठी हि केलेली एक याचिका आहे असे मला वाटते. नक्कीच एक स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार हे आपले न्यायालय आपल्याला देते मग त्याच प्रकारचा अंत देण्याचे काम हि आता न्यायालयाला करावे लागेल. मला माहित आहे हा एवढा सरळ प्रश्न नाहीये .. खरच आपण या सर्वांसाठी तयार झालो आहोत का ? आपला समाज एवढा प्रगल्भ झाला आहे का ? कारण आशा प्रकारचे प्रयत्न आधी सुद्धा झाले होते, पण त्या वेळी त्याला झालेला विरोध बघता आता वेळ आली आहे या सर्व विषयावर एक सखोल चर्चा घडवून आणण्याची .. मराठी सिनेमा "सुखांत" च्या निमित्त्याने नुकताच या विषयावर उजेड टाकण्यात आला आहे, त्या चित्रपटास मिळालेला प्रतिसाद देखील हेच दाखवून देते कि आपला मराठी समाज हा नक्कीच ह्या दिशेने आता विचार करण्यास सुरु करेल, पण तमाम धर्माचे, जातीचे आणि भाषेच्या लोकांनी आता या विषयावर आपले मत व्यक्त केलेपाहिजे.
या विषयावर प्रदीर्घ चर्चा घडवून आणली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाला आता एक ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे, त्या साठी त्यांना लागणारे ते धारिष्ट्य आपल्या समाजाने आपल्या न्याय प्रणालीला दिले पाहिजे. अशा प्रकारच्या कायद्याचे उपयोग आणि दुरुपयोग या दोन्ही बाजूंबद्दल विधी क्षेत्रातील नामवंतांनी आता समाज जागृती केली पाहिजे.
मरण यातना भोगणाऱ्या काही रुग्णांची वेदना समजून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे, त्यांना या वेदनेतून सुटका करण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांचा "सुखांत".
मला माहित नाही कि माझे विचार चूक आहेत कि बरोबर , पण नक्कीच तुम्ही सुद्धा आता या विषयावर विचार करायला सुरु करा, नक्कीच यातून मार्ग सापडण्याची एक आशा मला आहे.
सध्या साठी एवढेच .. आपल्या प्रतिक्रिया .. आणि आपले विचार प्रकट करा.. मला खात्री आहे प्रगल्भतेकडे हे आपल्या समाजाचे एक नवे पाऊल असेल ..
अमोल सुरोशे (नांदापूरकर)
1 comment:
खरच खूप महत्वाचा विषय आहे. लहानपणापासून या बद्दल ऐकत आहे. पण अजून न्याय व्यवस्थेने हा हक्क मंजूर केलेला नाही. मरानाच्यापलीकडील वेदना जेंव्हा एखाद्याला त्रास देतात तेंव्हा, त्या व्यक्तीच दु:ख फक्त त्यालाच कळो, बर दुःख होतच की नाही ते ही आपल्याला माहित नाही. पण शून्य अवस्थेत इतक्या वर्ष जगणाराना ज्या वेदना होतात त्याच्या कितेक पट वेदना त्या व्यक्तीलातस जगताना पाहणाराना, आप्त आणि स्वकीयांना होत असतील.
हा हक्क देणे हा निर्णय धाडसी आहे, पण थोडा कायदेशीर मार्ग स्वीकारून या प्रकारचा काही तरी नियम बनवता ही येऊ शकेल. जसा वैद्यकीय सेवेतील तज्ञांचा सल्ला घेऊन नक्की त्या व्यक्तीला इच्छा मरण द्यायचे की नाही ह्या गोष्टी ठरवता येऊ शकतात. हे जसा मी बोलतोय तितकं सोपा नाही; पण निर्णय तर घ्यावाच लागणार आहे. तेंव्हा याचे सगळे पैलू माननीय न्यायालयाने तपासून मानवीय दृष्टीकोन ठेऊन निर्णय घ्यावा.
Post a Comment