आपली संस्कृती .. आपला बाणा !!!! ...
'नटरंग' संगीत परीक्षण .....
चित्रपट : नटरंग
संगीत : अजय - अतुल
गीत : गुरु ठाकूर
'झी टॉकीज' प्रस्तुती ......
------------------------------
******** लावणी .. Back With Bang.... ****************
तमाशा आणि लावणी यावर आधारित चित्रपटांना बरीच दशके उलटली ... याच विषयावर आधारित 'पिंजरा ' हा चित्रपट विशेष गाजला .
त्याच्या यशात मोलाचा वाट म्हणजे त्यातली अप्रतिम गाणी आणि त्याला राम कदम यांनी दिलेले अफलातून संगीत..
सध्याच्या काळात अशा प्रकारचा चित्रपट काढणे म्हणजे एक मोठा धाडस होतं . आणि तेच करून दाखवलं आहे 'झी टॉकीज' ने आगामी चित्रपट
' नटरंग ' मध्ये . आणि त्याला भन्नाट संगीत दिले आहे ' अजय - अतुल ' यांनी.
७० -८० च्या दशकातील वातावरणास साजेसं संगीत देणं हे खरोखरच कठीण काम आहे आणि तेही आजच्या श्रोत्याला समोर ठेऊन ..
त्याला योग्य न्याय संगीतकार ' अजय - अतुल ' , गीतकार - गुरु ठाकूर आणि बेला शेंडे च्या सुमधुर आवाजाने दिला आहे ...
१) 'नटरंग उभा' - सुरुवातीपासून शेवट पर्यंत श्रवणीय झाले आहे.. पुन्हा पुन्हा ऐकावे असे ... काय तो ढोलक .. कसला मस्त कोरस
"रसिक होऊ दे दंग , चढू दे रंग असा खेळला ,
साताजान्माची देवा पुण्याई लागु दे आज पणाला ,
हात जोडितो , आज आम्हाला, दान तुझा दे संग ,
नटरंग उभा , ललकारी नभा , स्वरताल जाहले दंग..."
सुरुवातला वाजणारी हार्मोनियम ची धून तर एक मास्टर पीस ...
२) कटाव १, २ , ३ : 'पिंजरा' ची आठवण करून देणारे कटाव ... 'अजय' च्या स्पेशल आवाजात ...
३) लावणी: वाजले की बारा - ' लावणी नाचताना बाईला खूप उशीर झाला आहे नऊ आणि दहा ची गाडी गेली आता बाराची पण गाडी निघायची वेळ
झाली आहे .. पण पाव्हणं काय जाऊ देत नाही ... त्यासाठी ती विनवणी करते आहे ' अशा झकास ( :) ) सिचुएशन वरची तुफान लावणी ..
बेला शेंडे , कमाल आहे तुझी .. काय गायली आहेस !!
४) खेळ मांडला : चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाणे ... शब्दच नाहीत वर्णन करायला .. गाण्याचं शेवटच १ मिनिट वाजणारे संगीत म्हणजे
एक अप्रतिम कलाविष्कार .. शेतात फिरणाऱ्या गोफण चा आवाज इतक्या चपखल पणे त्यात बसवला आहे.. यासाठी अजय अतुल ला सलाम ..
५) गवळण: कशी जाऊ मी मथुरेच्या बाजारी - सुंदर गायली आहे बेला आणि अजय ने .. पण इतर गाण्यांच्या तुलनेत कुठेतरी कमी प्रभावाकारक आहे...
एक वैशिष्ट्य म्हणजे ढोलक वेगळ्या पद्धतीने वाजवला आहे .. त्यासाठी तरी गाणे ऐकावेच ..
६) लावणी: अप्सरा आली - youtube वर आणि अवार्ड शो मध्ये खूप गाजलेली लावणी .. अतिशय वेगळ्या पद्धतीने सादर केली आहे ..
पुन्हा एकदा.. बेला शेंडे रॉक्स ... अजय ने " अप्सरा आली " ज्या स्टाइल ने म्हटले आहे .. एकदम कातील ...
ज्यू. सोनाली कुलकर्णी ने यावर डान्स केलेला टीवी वर पहिला ... बस .. वाट पाहतो आहे चित्रपटाची :)
Rating : * * * * 1/2
- रोहन पाटील
(Be Original Buy Original)
धन्यवाद रोहन .. आणि आपण सर्वांनी देखील हा चित्रपट जरूर बघावा ..
अमोल सुरोशे (नांदापूरकर)
2 comments:
बेक्कार ना! [सौजन्य: आमचा मित्र (खूप चांगल असा म्हण्यासाठी हि फ्रेज आमचा एक मित्र वापरतो) ]. पुन्हा एकदा मराठी चित्रपाटात ढोलकी वाजणार, पाय थिरकणार!
भन्नाट गाणी आणि भन्नाट संगीत यांनी सजलेला चित्रपट.............
आणि रोहन धन्यवाद, लोकांना अश्या संगीताची आणि चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल:)
वाट बघते आहे चित्रपटाची कारण अतुल कुलकर्णी च अभिनय पण बघायला मिळणार आहे.
Post a Comment