कॉलेज मध्ये श्याम भाऊंनी पहिल्या वर्षी शिव जन्मोत्सव सुरु केला, तेव्हाचा तो क्षण मला आज हि आठवतो .. भाषण स्पर्धेचे आम्ही आयोजन केलेले आणि आमचे प्रकाशराव त्यांच्या वक्तृत्वाने पूर्ण पणे स्टेज गाजवत होते .. त्यांची ती जिद्द, त्यांची तळमळ बघून प्रथमच स्वतःचेच रूप पहिल्या सारखे झाले... लोक आम्हाला नेहमी विचारतात.. शिव जयंती करून असे काय प्राप्त झाले.. त्यांना एक सांगू इच्छितो.. तो केवळ कार्यक्रम नव्हता तर ती होती एक तळमळ जी पुढे कधी तरी नक्कीच चळवळ म्हणून उभारेल.. विचारांचा असा एक धागा या कार्यक्रमा द्वारे बांधला गेले कि ज्या मध्ये माझ्या सारखे कित्ती तरी आपोआप बांधले गेले .. असाच एक माणूस जोडला गेला होता ज्याची गाठ नंतर अजून घट्ट झाली .. तो माणूस म्हणजे प्रकाश.
विचारांचा एक वारसा घेऊन ते आलेले, तश्याच प्रकारचे वैचारिक संस्कार आमच्या वरही झालेले .. " छत्रपती शिवाजी महाराज कि" म्हणल्यावर आपल्या बेंबीच्या देठापासून "जय" म्हणणारे होते ते प्रकाश राव .. हीच त्यांची आवड पुढे एक त्यांचे फार मोठे शस्त्र झाले.. विचारांचे शस्त्र ... विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी केलेले विवेचन खरोखरच खूप विचार करायला लावणारे आहे.
त्यांच्या विचारांचे ते तेज कायम वृद्धिंगत होवो.. त्या विचारांना आचरणाची हि साथ लाभो .. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि व्यायाक्तिक विचारांना नेहमी आई भवानी मातेचे आशीर्वाद लाभो एवढीच आजच्या या दिवशी कामना करतो ..
त्यांच्या या वाढ दिवसानिमित्या त्यांच्यातील प्रत्येक चांगल्या गुणांची वाढ होवो.. त्यांचे यश, कीर्ती नेहमी उत्तरोत्तर वाढतच जावो.. अतिशय भरभराटीचे आणि आन्दाचे आयुष्य त्यांना लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..
त्यांच्या वाढ दिवसानिमित्य त्यांना आम्हा सर्व मित्रांकडून खूप खूप शुभेच्छा ...
त्यांच्या सोबत घालवलेले काही क्षण इथे छायाचित्रांच्या मदतीने प्रकाशित करतो .. त्यांच्या आमच्या सोबतीचे काही क्षण ..






हि दोस्ती तुटायची नाय ...
4 comments:
Prakash rap Vadhdiwasachya hardik subechya !!!!!
आमच्या पण शुभेच्छा
many happy returns of this day sir
सर्वाना खूप खूप धन्यवाद!
राजे आमच्या वैचारिक जडण घडणीत तुमचा हि फार मोठा वाटा आहे. पहिल्या भाषणाची संधी तुम्हीच दिली होती आम्हाला कॉलेजमध्ये शिवजयंती साठी! पुढे तुम्ही टाकलेला विश्वास आणि मार्गदर्शन हे ही आमच्या जडणघडणीत फार म्हत्वाचे! अशेच मार्गदर्शन लाभत राहो ही आमची श्रींकडे इच्छा........!
जय महाराष्ट्र!
Post a Comment