जनाबेआलम अबु असीम आजमी यांस कृतानेक कुर्निसात.
दोन ब दोन हप्त्यांपूर्वी आपल्याशी महाराष्ट्राच्या भर विधानसभेत काही मराठी नतद्रष्टांनी बदसलुकी केली, त्याबद्दल मुआफी मागण्यासाठी हे खत आपल्याला दरोबस्त रवाना करीत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या मरगट्टय़ा काफरांच्या एका पक्षाने आपल्याशी असे वागायला नको होते. नको होते! नको होते!!
हा वाकई जुलुम झाला. भर सभागृहात ‘फाऽऽड’ असा आवाज घुमला आणि महाराष्ट्राचा नक्शा आपल्या गाल-ए-आजमवर उमटला, असे अखबारवाले आणि खबरवाले यांनी जाहीर करून टाकले. राष्ट्रभाषेचा मुखभंग
झाल्याची आवई आपल्या समाजवादी पार्टीचे मुल्लायम सिंग यांनी उठवली. हे सरासर झूठ आहे. आम्ही खुदबखुद दोनशे तीस वेळा तोच नजारा वेगवेगळ्या च्यानलांवर पाहिला. वेगवेगळ्या कोनातून पाहिला. कधी खडे होऊन पाहिला. कधी कूदकर पाहिला. कधी गडबडा लोळत पाहिला. कधी खटियावर लेटून पाहिला. कधी पेट धरधरुन पाहिला. कधी कधी तर आंखे मिटूनदेखील पाहिला. पण या सगळय़ा नजाऱ्यांमध्ये आम्हाला ‘फाऽऽड’ असा आवाज काही ऐकू आला नाही. आमचे कान कमालीचे तेजतर्रार आणि गध्यासारखे लंबेदेखील आहेत. कुठे खाटखुट झाले तरी बराबर ऐकू येते. तरीही आम्ही तो आवाज सुनण्यात कमी पडलो, हे मात्र खरे आहे. शायद असेही घडले असेल, की कुणी तुमच्या कानफटात मारलीच नसेल, आणि नुसतीच आवई उठवली असेल!.. खुदा खर करे आजमीसाहब, आपके कान और कान के नीचे का मैदान हमेशा सलामत रहे! पण इथेच आपल्याला होशियार राहण्याची गरज आहे. ही मराठी माणसे न केलेल्या कामगिरीचे श्रेय उपटण्यात माहीर आहेत, हे आपण ध्यानात ठेवावे. न मारलेल्या कानफटीच्या जोरावर ही मंडळी सॉलीड टीआरपी मिळवतात, आजमीसाहेब.
सारा प्रसंग आमच्या नजर-ए-नाचीजसमोर तरळतो आहे.. आपण आपली तश्रीफ उचललीत आणि आस्ते कदम निघालात, जसा जंगलात शेर आपल्या गुहेकडे जातो. जसा आलमगीर आपल्या तख्ताकडे जातो. जसा र्टेबाज मुर्गा आपल्या आवडत्या मुर्गीच्या खुराडय़ाकडे तुरा वळवतो.. इर्दगिर्द बाकडय़ांवर बसलेल्या नामुरादांचे नाकुर्निसात स्वीकारल्यासारखे करत तुमची सफेदपोश मूरत जणू ‘सिटीवॉक’ करीत जात होती. तो नजारा पाहून आमच्यासारख्या हितचिंतकांची, सच सच सांगतो, नींद उड गई!
आजमीसाहब, या काफरांच्या मुंबईत राहून, त्यांच्या नाकावर टिच्चून टगेगिरी करणे, सगळ्यांनाच जमते असे नाही. आपण तर इथे येऊन थेट शिवसेनेच्या वाघावरच असे काही डरकाळलात, की बस. मरहट्टय़ांच्या मुलखात येऊन बेदर्कार सियासती मामल्यात त्यांचा सफाया करणे, बाकायदा पोलिटिकल पार्टी चालवणे, ही सीधीसाधी चीज नाही...........अपूर्ण..... पूर्ण इथे वाचा : http://www.loksatta.com/lokprabha/20091127/fulya.htm
सौजन्य: www.loksatta.com
|
|
No comments:
Post a Comment