Thursday, December 31, 2009

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना आमच्या तर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...



नवे वर्ष.. नवा हर्ष .. हा हर्ष आणि उत्साह तुमच्या आयुष्यात नेहमी कायम राहो.. सुख .. समाधान .. आणि शांती तुम्हास लाभो हीच आजच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना ..

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

Wednesday, December 23, 2009

सावधान... मराठी वणवा पेट घेत आहे !!!

येणारे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक नवे कोरे पाऊल ठरणार आहे. येत्या नव वर्ष मध्ये अनेक नव नवीन चित्रपट आपल्या भेटीस येत आहेत, विविध विषय आणि अत्याधुनिक चित्रीकरण/सादरीकरण याने मराठी चित्रपटांचे रूप बदलले गेले आहे. नवीन वर्षा मध्ये खूप चं चित्रपटांची मेजवानी खास मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, आता गरज आहे ती आम्ही तमाम मराठी जनतेने आता चित्रपट गृहांकडे वळण्याची.

आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि संपूर्ण भारत देशाला दिलेल्या चित्रपट सृष्टीची कर्मभूमी आणि या क्षेत्राची पंढरी असलेल्या आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेची आणि मराठी चित्रपटांची चाललेली दुर्दशा खरच खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. गेल्या काही वर्षात अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलेले काही मराठी चित्रपट आपल्याच भूमीमध्ये सपशेल अयशस्वी ठरले आहेत, आमच्या प्रेक्षकांनी या सर्व चित्रपटांकडे अक्षरशः पाठ फिरवली.

याच अनुशंघाने "गाभ्रीचा पाऊस" चे निर्माते प्रशांत पेठे यांनी व्ही शांताराम पुरस्कार सोहळ्यामध्ये आपले भावनिक उद्गार काढले, सबंध जगात या चित्रपटाने शाबासकी मिळवली असतांना महाराष्ट्र मध्ये ह्या चित्रपटाला प्रदर्शित करायला सिनेमागृहे देखील मिळाले नाही , शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असलेला हा सिनेमा महाराष्ट्र सारख्या राज्यात पोहोचू शकला नाही आणि हे बोलतांना त्यांचे डोळे पाण्याने ओलावले होते. करोडो रुपयांचे नुकसान सहन करून देखील काही तरुण दिग्दर्शक काही नवीन कल्पना घेऊन विविध विषयांवर काही चित्रपट बनवत आहेत आणि आम्ही मात्र त्या चित्रपटांच्या सीडी (ते हि डुप्लीकेट ) ची वाट बघतो, पण आपण हे सहज पाने विसरतो कि हा चित्रपट बनवतांना सर्व कलाकारांनी घेतलेली मेहनत त्यावर खर्च होणारा पैसा. आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार कराल अन्यथा चांगले सिनेमे काढण्याची हिम्मत कोणी करणार नाही. आणि आमच्या महाराष्ट्राची परंपरा हि नेहमी चांगल्याच्या पाठीशी राहण्याची राहिलेली आहे.

आपण सर्व मिळून मराठी सिनेमा आणि चांगल्या कलाकृतींसाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, मराठी सिनेमा हा आवडतो पण आम्हाला तो कधी आला हेच काळात नाही, तर आपण सर्वांनी या बाबत कायम जागृत राहिले पाहिजे. चांगल्या विषयाचा मराठी सिनेमा सबंध महाराष्ट्रभर पोचलाच पाहिजे .. तेव्हाच आपल्या मराठी सिने सृष्टी ला परत एकदा ते सोन्याचे दिवस येतील ...

मराठी सिनेमा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मुख्यमंत्री ब्लॉग ने आता कंबर कसली आहे, आपण हि या साठी नेहमी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा करतो

येत्या जानेवारी मध्ये काही खास चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत, त्या साठी काही खास आपल्या सर्वांसाठी ...

दिनांक जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे ,


दिनांक जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे




तसेच अजुन एक चित्रपट
दिनांक जानेवारी २०१० ला प्रदर्शित होत आहे ,

तसेच जानेवारी मधे येत आहे


तसेच २२ जानेवारीला येत आहे

आपण सर्व हे मराठी चित्रपट चित्रपट गृहा मधेच जाऊन बघावे आणि आपली संस्कृती आपणच वाढवावी.

आपलाच
अमोल सुरोशे ... जय महाराष्ट्र !!!

Sunday, December 20, 2009

अबू आझमींच्या पिताश्रींचे गेट वे जवळील एका रस्त्याला नाव

अबू आझमींच्या पिताश्रींचे गेट वे  जवळील एका रस्त्याला नाव :



मराठी माणसां साठी एक अतिशय आनंदाची बातमी! राजीव गांधींचे नाव त्या सी लिंक ला नकोच होते; पण त्याला तावा तावाने विरोध करणारेच आता हे करत आहेत!
अधिक येथे: http://i496.photobucket.com/albums/rr321/janajagruti/abusena.jpg

Friday, December 18, 2009

परत एकदा लावणीचा बहार...... नटरंग

एके काळी आम्हा मराठी जणांना आपल्या ठेक्यावर ज्या लावणीने अक्षरशः नाचवले.. जिच्या तालावर तमाम मराठी माणूस थिरकला .. अशी आमची संस्कृती .. आमची ठसकेबाज लावणी .. परत एकदा आपल्या भेटीला येत आहे, स्वर्गीय व्ही. शांताराम यांच्या तमाशा चित्रपटांची गोडी आजही आमच्या मनामध्ये कायम असतांना आता 'झी टॉकीज' ची प्रस्तुती "नटरंग" च्या रूपाने परत एकदा या तमाच्या आणि लावणीच्या मोहिनीने आपल्या सर्वांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे .. त्या निमित्त्याने काही खास ... आपल्या मराठी प्रिया जाणते साठी ..
आपली संस्कृती .. आपला बाणा !!!! ...




'नटरंग' संगीत परीक्षण .....

चित्रपट : नटरंग
संगीत : अजय - अतुल
गीत : गुरु ठाकूर

'झी टॉकीज' प्रस्तुती ......
------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------

******** लावणी .. Back With Bang.... ****************

तमाशा आणि लावणी यावर आधारित चित्रपटांना बरीच दशके उलटली ... याच विषयावर आधारित 'पिंजरा ' हा चित्रपट विशेष गाजला .
त्याच्या यशात मोलाचा वाट म्हणजे त्यातली अप्रतिम गाणी आणि त्याला राम कदम यांनी दिलेले अफलातून संगीत..
सध्याच्या काळात अशा प्रकारचा चित्रपट काढणे म्हणजे एक मोठा धाडस होतं . आणि तेच करून दाखवलं आहे 'झी टॉकीज' ने आगामी चित्रपट
' नटरंग ' मध्ये . आणि त्याला भन्नाट संगीत दिले आहे ' अजय - अतुल ' यांनी.
७० -८० च्या दशकातील वातावरणास साजेसं संगीत देणं हे खरोखरच कठीण काम आहे आणि तेही आजच्या श्रोत्याला समोर ठेऊन ..
त्याला योग्य न्याय संगीतकार ' अजय - अतुल ' , गीतकार - गुरु ठाकूर आणि बेला शेंडे च्या सुमधुर आवाजाने दिला आहे ...

१) 'नटरंग उभा' - सुरुवातीपासून शेवट पर्यंत श्रवणीय झाले आहे.. पुन्हा पुन्हा ऐकावे असे ... काय तो ढोलक .. कसला मस्त कोरस
"रसिक होऊ दे दंग , चढू दे रंग असा खेळला ,
साताजान्माची देवा पुण्याई लागु दे आज पणाला ,
हात जोडितो , आज आम्हाला, दान तुझा दे संग ,
नटरंग उभा , ललकारी नभा , स्वरताल जाहले दंग..."
सुरुवातला वाजणारी हार्मोनियम ची धून तर एक मास्टर पीस ...

२) कटाव १, २ , ३ : 'पिंजरा' ची आठवण करून देणारे कटाव ... 'अजय' च्या स्पेशल आवाजात ...

३) लावणी: वाजले की बारा - ' लावणी नाचताना बाईला खूप उशीर झाला आहे नऊ आणि दहा ची गाडी गेली आता बाराची पण गाडी निघायची वेळ
झाली आहे .. पण पाव्हणं काय जाऊ देत नाही ... त्यासाठी ती विनवणी करते आहे ' अशा झकास ( :) ) सिचुएशन वरची तुफान लावणी ..
बेला शेंडे , कमाल आहे तुझी .. काय गायली आहेस !!

४) खेळ मांडला : चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाणे ... शब्दच नाहीत वर्णन करायला .. गाण्याचं शेवटच १ मिनिट वाजणारे संगीत म्हणजे
एक अप्रतिम कलाविष्कार .. शेतात फिरणाऱ्या गोफण चा आवाज इतक्या चपखल पणे त्यात बसवला आहे.. यासाठी अजय अतुल ला सलाम ..

५) गवळण: कशी जाऊ मी मथुरेच्या बाजारी - सुंदर गायली आहे बेला आणि अजय ने .. पण इतर गाण्यांच्या तुलनेत कुठेतरी कमी प्रभावाकारक आहे...
एक वैशिष्ट्य म्हणजे ढोलक वेगळ्या पद्धतीने वाजवला आहे .. त्यासाठी तरी गाणे ऐकावेच ..

६) लावणी: अप्सरा आली - youtube वर आणि अवार्ड शो मध्ये खूप गाजलेली लावणी .. अतिशय वेगळ्या पद्धतीने सादर केली आहे ..
पुन्हा एकदा.. बेला शेंडे रॉक्स ... अजय ने " अप्सरा आली " ज्या स्टाइल ने म्हटले आहे .. एकदम कातील ...
ज्यू. सोनाली कुलकर्णी ने यावर डान्स केलेला टीवी वर पहिला ... बस .. वाट पाहतो आहे चित्रपटाची :)


Rating : * * * * 1/2

- रोहन पाटील
(Be Original Buy Original)

धन्यवाद रोहन .. आणि आपण सर्वांनी देखील हा चित्रपट जरूर बघावा ..



अमोल सुरोशे (नांदापूरकर)

कुणी मरण देता का... मरण !!!!

जीवन मरणाच्या प्रश्नावर बोलण्या एवढा मी नक्कीच मोठे नाहीये, पण एक प्रश्न मनामध्ये सतत येत होता आणि तो या निमित्त्याने इथे व्यक्त करू इच्छितो.

सध्या "इच्छामरण" किंवा "दयामरण" या विषयांवर प्रसार माध्यमांच्या द्वारे भरपूर चर्चा होतांना दिसते आहे, कारण आहे ते अरुणा शानबाग यामहिलेचे ..

अरुणा शानबाग.. या महिलेची करून कहाणी ऐकून नक्कीच सर्वांचे मन हेलावून जाईल .. आणि माझे हि हेलावले.

अरुणा ह्या मुंबई मधील केइएम हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून कामाला होत्या त्या वेळी त्यांच्या वर झालेल्या अति प्रसंगामुळे त्यांना जबर मानसिक आणि शाररीक धक्का बसला .. ज्या धक्क्यातून त्या गेल्या ३६ वर्षे सावरलेल्या नाहीत. गेली ३६ वर्षे त्या कोमा मध्ये आहेत, श्वास चालू आहेत .. पण जीव कधीच निघून गेलाय.. ३६ वर्षे झाले त्यांना या हॉस्पिटल मध्ये सांभाळले जाते, जबरीने त्यांना जेवण खाऊ घालावे लागते, त्यांची हि करून अवस्था बघून त्यांच्या वर एक पुस्तक लिहिणाऱ्या महिला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक दयामारणाची याचिका दाखल केलीये. या निमित्त्याने काही प्रश्न आपल्या समाजासमोर आले आहेत ज्याचे उत्तर शोधणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे..

अरुणा वर अति प्रसंग करणार्याला ७ वर्षे शिक्षा होऊन तो सुटला देखील पण जिच्यावर हा अत्याचार झाला ती मात्र गेली ३६ वर्षे ह्या मरणप्राय वेदना सहन करून आपले जीवन जगात आहे, मग मला सांगा.. इथे कुठला न्याय झाला? .. ज्या व्यक्तीने अपराध केला त्या हि पेक्षा हि भयानक शिक्षा जिच्यावर हा अन्याय झाला तिलाच भेटली. आज हि तिच्या पुढील जीवनात काही सुधारणा होण्याची कसलीही शक्यता नाहीये.. आज त्यांचे वय ६२ वर्षे आहे, गेली ३६ वर्षे त्यांचे जीवन कसे असेल ह्याचइ आपण कल्पना न केलेली बरी .. म्हणून त्यांच्या सुखांतासाठी हि केलेली एक याचिका आहे असे मला वाटते. नक्कीच एक स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार हे आपले न्यायालय आपल्याला देते मग त्याच प्रकारचा अंत देण्याचे काम हि आता न्यायालयाला करावे लागेल. मला माहित आहे हा एवढा सरळ प्रश्न नाहीये .. खरच आपण या सर्वांसाठी तयार झालो आहोत का ? आपला समाज एवढा प्रगल्भ झाला आहे का ? कारण आशा प्रकारचे प्रयत्न आधी सुद्धा झाले होते, पण त्या वेळी त्याला झालेला विरोध बघता आता वेळ आली आहे या सर्व विषयावर एक सखोल चर्चा घडवून आणण्याची .. मराठी सिनेमा "सुखांत" च्या निमित्त्याने नुकताच या विषयावर उजेड टाकण्यात आला आहे, त्या चित्रपटास मिळालेला प्रतिसाद देखील हेच दाखवून देते कि आपला मराठी समाज हा नक्कीच ह्या दिशेने आता विचार करण्यास सुरु करेल, पण तमाम धर्माचे, जातीचे आणि भाषेच्या लोकांनी आता या विषयावर आपले मत व्यक्त केलेपाहिजे.
या विषयावर प्रदीर्घ चर्चा घडवून आणली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाला आता एक ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे, त्या साठी त्यांना लागणारे ते धारिष्ट्य आपल्या समाजाने आपल्या न्याय प्रणालीला दिले पाहिजे. अशा प्रकारच्या कायद्याचे उपयोग आणि दुरुपयोग या दोन्ही बाजूंबद्दल विधी क्षेत्रातील नामवंतांनी आता समाज जागृती केली पाहिजे.

मरण यातना भोगणाऱ्या काही रुग्णांची वेदना समजून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे, त्यांना या वेदनेतून सुटका करण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांचा "सुखांत".

मला माहित नाही कि माझे विचार चूक आहेत कि बरोबर , पण नक्कीच तुम्ही सुद्धा आता या विषयावर विचार करायला सुरु करा, नक्कीच यातून मार्ग सापडण्याची एक आशा मला आहे.

सध्या साठी एवढेच .. आपल्या प्रतिक्रिया .. आणि आपले विचार प्रकट करा.. मला खात्री आहे प्रगल्भतेकडे हे आपल्या समाजाचे एक नवे पाऊल असेल ..

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Saturday, December 12, 2009

वाढ दिवस विशेष...........

आजच्या या १३ डिसेंबर निमित्य काही आठवणींना उजाळा मिळाला, कॉलेज जीवनातील काळ होता अनेक मित्र भेटले. तसा भेटणारा प्रत्येक जन त्याची एक ओळख ठेवून जात असतो पण काही लोकांची ओळख हि त्यांच्यातील वेगळे पणा मुळे कायम मनामध्ये घर करूनजाते , आशाच एका मित्राची ओळख मला कॉलेज मध्ये असतांना झाली, आणि तो मित्र केवळ आठवणीत न राहता अजून हि माझ्या सोबत आहे याचा मला खूप आनंद होतो, तो मित्र म्हणजे आमचे प्रकाशराव...

कॉलेज मध्ये श्याम भाऊंनी पहिल्या वर्षी शिव जन्मोत्सव सुरु केला, तेव्हाचा तो क्षण मला आज हि आठवतो .. भाषण स्पर्धेचे आम्ही आयोजन केलेले आणि आमचे प्रकाशराव त्यांच्या वक्तृत्वाने पूर्ण पणे स्टेज गाजवत होते .. त्यांची ती जिद्द, त्यांची तळमळ बघून प्रथमच स्वतःचेच रूप पहिल्या सारखे झाले... लोक आम्हाला नेहमी विचारतात.. शिव जयंती करून असे काय प्राप्त झाले.. त्यांना एक सांगू इच्छितो.. तो केवळ कार्यक्रम नव्हता तर ती होती एक तळमळ जी पुढे कधी तरी नक्कीच चळवळ म्हणून उभारेल.. विचारांचा असा एक धागा या कार्यक्रमा द्वारे बांधला गेले कि ज्या मध्ये माझ्या सारखे कित्ती तरी आपोआप बांधले गेले .. असाच एक माणूस जोडला गेला होता ज्याची गाठ नंतर अजून घट्ट झाली .. तो माणूस म्हणजे प्रकाश.

विचारांचा एक वारसा घेऊन ते आलेले, तश्याच प्रकारचे वैचारिक संस्कार आमच्या वरही झालेले .. " छत्रपती शिवाजी महाराज कि" म्हणल्यावर आपल्या बेंबीच्या देठापासून "जय" म्हणणारे होते ते प्रकाश राव .. हीच त्यांची आवड पुढे एक त्यांचे फार मोठे शस्त्र झाले.. विचारांचे शस्त्र ... विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी केलेले विवेचन खरोखरच खूप विचार करायला लावणारे आहे.

त्यांच्या विचारांचे ते तेज कायम वृद्धिंगत होवो.. त्या विचारांना आचरणाची हि साथ लाभो .. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि व्यायाक्तिक विचारांना नेहमी आई भवानी मातेचे आशीर्वाद लाभो एवढीच आजच्या या दिवशी कामना करतो ..

त्यांच्या या वाढ दिवसानिमित्या त्यांच्यातील प्रत्येक चांगल्या गुणांची वाढ होवो.. त्यांचे यश, कीर्ती नेहमी उत्तरोत्तर वाढतच जावो.. अतिशय भरभराटीचे आणि आन्दाचे आयुष्य त्यांना लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..

त्यांच्या वाढ दिवसानिमित्य त्यांना आम्हा सर्व मित्रांकडून खूप खूप शुभेच्छा ...

त्यांच्या सोबत घालवलेले काही क्षण इथे छायाचित्रांच्या मदतीने प्रकाशित करतो .. त्यांच्या आमच्या सोबतीचे काही क्षण ..


हि दोस्ती तुटायची नाय ...

Friday, December 11, 2009

वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा .................

आज १२ डिसेंबर ,तमाम महाराष्ट्रभर जनाधार लाभलेले दोन बड्या राजकीय नेत्यांचा वाढ दिवस.

महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील राजकारनाची माहिती असणारा नेता म्हणजे पवार साहेब, वयाच्या ३६ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर बसलेले सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार ... राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध भूमिका पार पडणारे नेतृत्व .. तळागाळातील कार्यकर्त्यांचा अचूक अभ्यास असणारा नेता.. भारताचे कृषिमंत्री तथता खासदार शरद पवार यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्रातील अजून एक जनाधार लाभलेले नेतृत्व म्हणजे गोपीनाथराव मुंढे साहेब, अनेक नेते ज्यांनी स्वतः तयार केले आणि ज्यांच्या जादूच्या कांडीने भल्या भल्याचे राजकारण पालटून गेले असे बीड चे भूमिपुत्र.. आणि धडाडीचे तथा कणखर नेतृत्व असलेल्या गोपीनाथ मुंढे यांचा हि आज वाढ दिवस .. त्यांना हि खूप खूप शुभेच्छा


महाराष्ट्रातील तमाम जनता या दोघां कडून प्रगत महाराष्ट्र साठी खूप अपेक्षा ठेवून आहेत.. त्यांच्या करावी ह्या सर्व अपेक्षा पूर्ण होवोत .. एवढीच आजच्या या दिवशी प्रार्थना ..



आज वर्तमान महाराष्ट्रातील दोन बड्या राजकीय नेत्यांचा वाढदिवस, पण उद्या म्हणजे १३ डिसेंबर,

उद्याच्या आधुनिक महाराष्ट्राचा स्वप्न बघणारे ॥ ज्वलंत आणि आधुनिक विचारांचा नेहमी पुरस्कार करणारे आणि ते विचार सामान्य अति सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा बाळगणारे आमचे मित्र म्हणजे प्रकाश पिंपळे पाटील ॥ शिवरायांचा वारसा आगदी अभिमानाने सांगणारे ॥ मराठी स्वाभिमान ॥ आणि कणखर मराठी बाणा जपणारे प्रकाश पिंपळे यांचा उद्या १३ डिसेंबर ला वाढ दिवस ॥ या मुख्यमंत्री ब्लॉग चे संस्थापक तथा योगदान कर्ते.. मा. प्रकाशराव पिंपळे पाटील यांचा वाढ दिवस ...

नव्या विचारांची .. नव-नव्या क्षेत्रांचे त्यांना ज्ञान मिळो.. सामान्य लोकांचे प्रश्न समजून उद्याच्या महाराष्ट्र घडवण्या मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असो हीच जगदंब चरणी प्रार्थाना ..

आणि उद्या १३ डिसेंबर निमित्य .. त्यांना ही वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेचछा..

शुभेच्छुक..

अमोल सुरोशे आणि समस्त मित्र मंडळ .. आणि मुख्यमंत्री वाचक परिवार ...

खुशखबर .. अखेर सरकारची नशा उतरली ...

परवा सरकारच्या व्यसनमुक्तीची गरज आहे आशा आशयाचा लेख लिहिला.. बर्याच प्रसार माध्यमांनी देखील हा मुद्दा उचलून धरला .. आणि शेवटी सरकार नमते झाले.. धान्या पासून दारू बनवण्याचा निर्णय सरकारने अखेर रद्द केला. सर्व दिलेले परवाने स्थगित करण्यात येतील आणि दिलेले अनुदान देखील परत घेतले जाणार आशी माहिती गृहमंत्री आबा पाटील यांनी काल विधिमंडळात दिली. या संदर्भात प्रश्न उचलून धरणाऱ्या त्या सर्व लोक प्रतिनिधींचे जाहीर आभार.. शेवटी लोकशाहीचा विजय झाला.. लोकांच्या इच्छेचा आदर करून शासनांनी हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल त्यांचे हि अभिनंदन.

या बाबतीत आज वर्तमानपत्रात बातम्या देखील आल्या आहेत

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=31158:2009-12-11-18-13-16&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104



आणि काल आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभार .. समाज घडवण्यासाठी आपला सहभाग नेहमीच अपेक्षित आहे ....

आपलाच ..
अमोल सुरोशे

व्यसनमुक्ती महाराष्ट्र शासनाची

सध्या आमचे महाराष्ट्र शासन दारू पिऊन झिंगणाऱ्या माणसा सारखे रोज काही न काही बरळत आहे, त्यांना सकाळ संध्याकाळ नेहमी "दारू - दारू आणि फ़क़्त दारूच " एवढा दिसत आहे.

कदाचित कसलेही कर्तुत्व नसतांना आमच्या मराठी जनतेने त्यांना पुन्हा एकदा खुर्चीवर बसविले आणि बहुतेक त्याचा त्यांना जोरदार सेलिब्रेशन करायचा आहे, म्हणून सरकार स्थापन झाल्या पासून हे लोक विविध प्रकारच्या दारूच्या गोष्टी करत आहेत.
इन मीन चार दिवसांमध्ये आमच्या आदिवासी मंत्र्यांना मोह पासून दारू बनवण्याचा "मोह" सुटला, या पूर्वी ते वनमंत्री होते बहुतेक तेव्हाच त्यांची नजर तिथे गेली असेल, पुढे लोकांचा कडवा विरोध बघून त्यांनी तात्पुरता का होईना हा मोह आवरता घेतलेला दिसतोय. पण त्यांना हा मोह पुन्हा कधी होईल हे काही सांगता येत नाही. गरीब आदिवासी लोकांच्या असलेल्या पारंपारिक जमिनी हिसकावून गेली साठ वर्षे आम्ही त्यांना आधीच भरपूर न्याय दिला आहे , आता या दारू पायी त्यांचे राहिलेले आयुष्य हि उध्वस्त करू पाहतोय. एवढ्या वर्षात त्यांच्या साठी काही ठोस शैक्षणिक, सामाजिक आर्थिक योजना राबविण्यात यांना अपयश आले आणि हे रोज नव नवीन योजना ज्यांचा फायदा काही ठराविक खादी वाल्यांना आणि ठेकेदारान्ना होणार.आणि हे कम मात्र ह्यांच्या यादी मध्ये सर्वात आगोदर आहे।

हे वादळ थांबते न थांबते तोच आता धान्या पासून दारू बनविण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला आहे.एकीकडे गरीब आणि सामान्य लोकांना रोजचे जीवनावश्यक धान्य आवाक्या बाहेर जात आहे, महागाई ने आपला कळस गाठला आहे, शासन मुर्दाडा सारखे पडून आहे, सामान्य माणूस ओरडून ओरडून थकला आहे, आवश्यक धान्याची काळा बाजरी होतांना दिसत आहे, कृत्रिम महागाई निर्माण करण्यात येत आहे .. आणि आमचे शासन या धान्या पासून दारू बनवण्याचे प्रयत्न करीत आहे, म्हणजे लोकांनी आता धान्य न खाता सरळ दारूच ढोसावी असा सल्ला जणू सरकार देत आहे. खराब अन्न धान्या पासून दारू बनवणार हा जरी दावा असला तरी त्या मागचे दूरचे दुष्परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि या मागचे काळे कारनामे आपणच शोधून काढले पाहिजेत.

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे कि नाही" हे विचारण्याची वेळ आता आली आहे, लोक कल्याणकारी सरकार स्थापन करून समाजाच्या कल्याणासाठी काही करण्याचे सोडून ह्या सरकारला दिवसा ढवळ्या दारूचे कारखाने सुरु करण्याची दुर्बुद्धी सुचली आहे .. लोकांना खायला अन्न नाही , आज हि आमच्या देशात ४०% लोक आर्ध पोटी झोपतात आणि ह्यांना त्यांचे पोट भरण्या ऐवजी त्यांना दारू पाजण्याचे सुचत आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दारू बनवण्याचे कारखाने आणि त्यांचे परवाने हे तमाम राजकीय पक्षातील लोकांना वाटले गेले आहेत, माझ्या कडे सर्व नावे आहेत पण एवादाच सांगू इच्छितो कि या मध्ये सर्वच राजकीय पक्षातील बड्या राजकारण्यांचा समावेश आहे, म्हणून कोण्या एकाला दोष देण्यात काही आर्थ नाही .. सांगायचा उद्देश हा कि तमाम राजकीय बळ ह्या दारू बनवण्याच्या मागे आहे.. आता गरज आहे या राजकीय आणि धनशक्ती विरुद्ध आपल्याला उठाव करावा लागणार .. एव्हडे दिवस आपल्याला पिळून खाणारे हे राजकारणी आता आपल्या खाण्यावरच उठले आहेत.. आताच जागे व्हा नाही तर उद्या आपल्या खाण्याचे पण वंदे होतील आणि आज चपाती नाही म्हणून लेकरांना गहू-ज्वारी पासून बनलेली दारू पाजावीलागेल.

हे सर्व कमी होते कि काय परवा आमचे राणे साहेब म्हणाले कि, आमचा शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतो, त्यांना माझी विनंती आहे कि त्यांनी मेलेल्या लोकांची आकडेवारी परत एकदा बघावी.. कित्ती लोक दारू पिणारे होते आणि कित्ती नाहीत, त्यांचा दारू बंदी करा हा निर्णय योग्यच होता पण त्याचे खापर आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या माथी मारायची काही गरज नव्हती, त्यांना विष प्यायला पैसा नाही आणि हे त्यांना दारुडे कसे काय म्हणू शकतात .. एकीकडे दारू मुळे शेतकरी आत्महत्या करतो म्हणायचा आणि दुसरी कडे दारू उद्योगाला चालण्या देण्या साठी सारे सरकार कामाला लागते आहे .. हे न समजण्या इतपत आम्ही काय वेडे आहोत का .. आणि न समजनार्यांनो आता तरी समजून घ्या .. कसला सावळा गोंधळ सुरु आहे इथे ..

हा निर्णय घेतांना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव येईल हे एक कारण दिले जात आहे, मला खरच त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची कीव येते, इथे आमचा शेतकरी गेली कित्येक वर्षे रोज मारत आहे, त्यांच्या सध्या सुध्या गरजा हे लोक पुर्या करू शकले नाहीत, पाणी नाही , वीज नाही, खात नाही, बी बियाणे नाही आणि हे काहीच नसतांना उगवलेल्या थोड्या थोडक्या अन्न धान्या पासून यांना दारू बनवायची आहे, म्हणजे आज वर आम्हाला खाऊ घालणारा उपाशी होताच आता आम्हा सर्वांना पण उपाशी मारण्याचे ह्यांचे कारस्थान दिसत आहे. या मागे कुठल्याही प्रकारचे शेतकर्याचे कल्याण नसून इथे काही राजकीय लोकांची घरे भरण्यासाठी हा दारू चा धंदा शासनमान्य करण्याचा हा डाव आहे.

हा डाव वेळीच हाणून पडला पाहिजे .. दारू ची नाश काना खाली वाजवल्या शिवाय उतरत नाही, या सरकारची नशा उतरवायची असेल तर त्यांना लवकर शुद्धी वर आणणे हे आपले कर्तव्य आहे .

ह्या विरोधात आपण आपल्या परीने होईल तिथे होईल तसा विरोध प्रकट करूया, पुढे ह्याच्या विरोधात एक लढा हि उभा राहील त्या लढ्या मध्ये देखील सामील होऊया .. चांगल्या समाजाची निर्मिती मध्ये आपला प्रत्येकाचा सहभाग हा असलाच पाहिजे ..

जय हिंद .. जय महाराष्ट्र

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Thursday, December 10, 2009

राष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा आपल्या देशात रिवाज आहे. त्यात मरहट्टय़ांची बोली.....

साहेब
राष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा आपल्या देशात रिवाज आहे. त्यात मरहट्टय़ांची बोली याने की मराठी ही एक भंकस बोली आहे. आजतलक ती बोली शिकून घेण्याची काही वजह नव्हती. काय गरज पडते? लेकिन चुनून आल्यानंतर ती बोली मी शिकून घेईन असे तुम्ही जाहीर केले होते.
जनाबेआलम अबु असीम आजमी यांस कृतानेक कुर्निसात.
दोन ब दोन हप्त्यांपूर्वी आपल्याशी महाराष्ट्राच्या भर विधानसभेत काही मराठी नतद्रष्टांनी बदसलुकी केली, त्याबद्दल मुआफी मागण्यासाठी हे खत आपल्याला दरोबस्त रवाना करीत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या मरगट्टय़ा काफरांच्या एका पक्षाने आपल्याशी असे वागायला नको होते. नको होते! नको होते!!
हा वाकई जुलुम झाला. भर सभागृहात ‘फाऽऽड’ असा आवाज घुमला आणि महाराष्ट्राचा नक्शा आपल्या गाल-ए-आजमवर उमटला, असे अखबारवाले आणि खबरवाले यांनी जाहीर करून टाकले. राष्ट्रभाषेचा मुखभंग
 
झाल्याची आवई आपल्या समाजवादी पार्टीचे मुल्लायम सिंग यांनी उठवली. हे सरासर झूठ आहे. आम्ही खुदबखुद दोनशे तीस वेळा तोच नजारा वेगवेगळ्या च्यानलांवर पाहिला. वेगवेगळ्या कोनातून पाहिला. कधी खडे होऊन पाहिला. कधी कूदकर पाहिला. कधी गडबडा लोळत पाहिला. कधी खटियावर लेटून पाहिला. कधी पेट धरधरुन पाहिला. कधी कधी तर आंखे मिटूनदेखील पाहिला. पण या सगळय़ा नजाऱ्यांमध्ये आम्हाला ‘फाऽऽड’ असा आवाज काही ऐकू आला नाही. आमचे कान कमालीचे तेजतर्रार आणि गध्यासारखे लंबेदेखील आहेत. कुठे खाटखुट झाले तरी बराबर ऐकू येते. तरीही आम्ही तो आवाज सुनण्यात कमी पडलो, हे मात्र खरे आहे. शायद असेही घडले असेल, की कुणी तुमच्या कानफटात मारलीच नसेल, आणि नुसतीच आवई उठवली असेल!.. खुदा खर करे आजमीसाहब, आपके कान और कान के नीचे का मैदान हमेशा सलामत रहे! पण इथेच आपल्याला होशियार राहण्याची गरज आहे. ही मराठी माणसे न केलेल्या कामगिरीचे श्रेय उपटण्यात माहीर आहेत, हे आपण ध्यानात ठेवावे. न मारलेल्या कानफटीच्या जोरावर ही मंडळी सॉलीड टीआरपी मिळवतात, आजमीसाहेब.
सारा प्रसंग आमच्या नजर-ए-नाचीजसमोर तरळतो आहे.. आपण आपली तश्रीफ उचललीत आणि आस्ते कदम निघालात, जसा जंगलात शेर आपल्या गुहेकडे जातो. जसा आलमगीर आपल्या तख्ताकडे जातो. जसा र्टेबाज मुर्गा आपल्या आवडत्या मुर्गीच्या खुराडय़ाकडे तुरा वळवतो.. इर्दगिर्द बाकडय़ांवर बसलेल्या नामुरादांचे नाकुर्निसात स्वीकारल्यासारखे करत तुमची सफेदपोश मूरत जणू ‘सिटीवॉक’ करीत जात होती. तो नजारा पाहून आमच्यासारख्या हितचिंतकांची, सच सच सांगतो, नींद उड गई!
आजमीसाहब, या काफरांच्या मुंबईत राहून, त्यांच्या नाकावर टिच्चून टगेगिरी करणे, सगळ्यांनाच जमते असे नाही. आपण तर इथे येऊन थेट शिवसेनेच्या वाघावरच असे काही डरकाळलात, की बस. मरहट्टय़ांच्या मुलखात येऊन बेदर्कार सियासती मामल्यात त्यांचा सफाया करणे, बाकायदा पोलिटिकल पार्टी चालवणे, ही सीधीसाधी चीज नाही...........अपूर्ण..... पूर्ण इथे वाचा : http://www.loksatta.com/lokprabha/20091127/fulya.htm











सौजन्य: www.loksatta.com

Thursday, December 3, 2009

"झेंडा" Music Review.. Nice songs .

!!!!!!!!!!!!!!!!!!! अवधूतचा झेंडा उंच फडकू दे !!!!!!!!!!!!!!!!!!!




अवधूत गुप्ते ची निर्मिती , दिग्दर्शन आणि संगीत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल लोकांना फारच अपेक्षा आहेत ...
आणि त्या आशा अवधूतने भन्नाट संगीत देऊन कायम ठेवल्या आहेत ...
गाणी ऐकल्यावर त्याच्याच शब्दात म्हणावसं वाटते .. ' मित्रा , तोडलंस रे ...'

- कोणता झेंडा घेऊ हाती - ज्ञानेश्वर मेश्राम सारख्या दमदार आवाजातले झकास गाणे ...
Rock संगीतात मधेच वाजणारे मृदुंग हा एक वेगळच प्रयोग अवधूत ने यशस्वी केला आहे... पुन्हा पुन्हा ऐकावेसे ... रोमांचक ..

- सावधान - यासारखे मराठी Hard Rock क्वचितच ऐकायला मिळते ... 'सावधान .. वणवा पेट घेतो आहे ' खरोखरच आग लावणारे गाणे आहे ...

- सांग ना रे मना - 'Not only Rock.. ' यापूर्वी अवधूतने romantic गाणीही छान केली आहेत .. हे ही एक असेच सुंदर गाणे स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी च्या आवाजात..

- जल जले - नेहमीप्रमाणे एक तरी हिंदी गाणे अवधूत च्या अल्बम मध्ये असतेच .. यातही आहेत.. Guitar आणि Drums भन्नाट .... तितकेच जबरदस्त त्याने गायले आहे .

- आसूओ कि खवाइशे - आणखी एक हिंदी गाणे .. माहित नाही इतक्या हिंदी गाण्याची गरज आहे कि नाही चित्रपटात .. पाहिल्यावरच कळेल.
ते काहीही असो गाणे एकदम 'कडक' आहे ... अप्रतिम कोरस ..

- पत्रास कारण कि बोलायची हिम्मत नाही - खरच मलाही बोलावसं वाटत नाही. फारशी वाद्ये न वापरताही प्रभावकारी वाटते.. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारित ....

- पाटील आला - एक ठीक ठाक लावणी ... आवडण्यासाठी कदाचित जरा जास्त वेळेस ऐकावी लागेल

- नाखवा रे (Bonus Track) - एक OK OK कोळीगीत ...

गीतकार गुरु ठाकूर , अरविंद जगताप , अवधूत यांनी लिहिलेल्या गाण्यान्माधील शब्द न शब्द प्रभावादार आहेत.. ताजेतवाने आहेत..
मित्रा अवधूत .. मराठी संगीतात असाच वादळ निर्माण करत राहा ...

जिंकलस रे लेका ......
चाबूक ...................



Rating : * * * 1/2

- रोहन पाटील
(Be Original Buy Original)

मराठी पाउल पडते पुढे ...


मधल्या काळात मराठी सिनेमाला आलेली मरगळ झटकून मराठी सिनेमा आता आपली कात टाकू लागलाय, अनेक उच्च कोटीच्या कलाकृती या मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये दाखल होत आहेत.
तोच तो पण म्हणून आपली नाक मुरडणारा आमचा मराठी प्रेक्षक आता पुन्हा सिनेमा गृहांकडे वळेल अशी अपेक्षा नक्कीच करता येईल.
गेली कित्येक वर्षे या मराठी सिनेमाने आमच्या या मराठी जनतेला आगदी हसवले, रडवले. त्या त्या काळाच्या आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रभाव त्या काळातील चित्रपटांमध्ये दिसून येतो.

अगदी भक्तीपर चित्रपटांपासून ते तमाशा चित्रपट, तसेच राजकीय सामाजिक विषयावर भाष्य करणारे अनेक चित्रपटांनी आम्हाला अगदी खिळवून ठेवले.

आज पिढी बदलली .. तसेच काही स्वागतार्ह बदल आमच्या मराठी सिनेमा मध्ये हि झाले .. मराठी चित्रपट दुसर्यांदा ऑस्कर वारी ला निघाला .. अनेक अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठी चित्रपट आपले वेगळे स्थान टिकवून आहे, मराठी चित्रपटाचा दर्जा हा आता नक्कीच अंतर-राष्ट्रीय झाला आहे ह्या मध्ये कुठलेही दुमत नाही.

सध्याच्या काही काळात प्रदर्शित झालेले काही चित्रपट ज्यांनी आपले वेगळे पण सिद्ध केले आहे.

वळू, टिंग्या , गाभ्रीचा पाऊस , मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, चेकमेट, गोष्ट छोटी डोंगरा एव्हढी, जोगवा , गंध , गैर, कैनवास, सुखांत, हरीश चंद्राची.. वैगेरे अगदी आत्ताचे हे चित्रपटांवरून आपल्या लक्षात येईल कि मराठी सिनेमा खूप बदललाय. येणारे काही चित्रपट झेंडा, नटरंग, आणि अनेक नवीन नवीन विषयांना हात घालणारे आणेल चित्रपट येऊ घातले आहेत.

वरील पैकी प्रत्येक चित्रपट हा आपले वेगळे पण टिकवून आहे.

गरज आहे या चित्रपटांची माहिती सर्वांना होण्याची कारण आपली नेहमी एकाच ओरड असते, मराठी सिनेमा आलेला काळातच नाही ॥ तरी आपण सर्व मराठी मनाच्या लोकांनी जेव्हा जेंव्हा आपल्याला या मराठी सिनेमांबद्दल समजेल ते आपण इतर हि सर्वांना कळवावे .. मराठी सिनेमा एक नवा श्वास घेतोय .. त्याला गरज आहे आपल्या प्रतिसादाची ..

अमोल ....