
लोकमत च्या मैत्र या पुरवणी मध्ये सदर लेख आलेला .. खरच मनाला भिडला .. ज्या विचारांच्या युद्धातून मी - तुम्ही जातो .. त्याचे उत्तर खूप सध्या आणि सोप्या भाषेत इथे नमूद केले आहे, मला खूप आवडला म्हणून आपणा सर्वांसाठी हा सदर लेख इथे टाकत आहे.
लोकमत आणि मैत्र परिवाराचे आभार ज्यांनी एवढ्या छान शब्दामध्ये विचारांचा चालू असलेला गोंधळ कमी करण्याचे काम केले.
नुसता विचार करत राहिलात, तर तुमच्या प्रश्नांना कुणी रेडीमेड उत्तर देणार नाही. जे मनापासून वाटत , ते करून पाहणे .. ज्या मार्गावर जावस वाटत; त्यावरून चार पावलं चालून पाहन - एवढा तरी जमवा .. कदाचित वाट सापडेल.
जीवन जगतांना खूप काही करण्याची इच्छा तर असते मात्र आपला नेमका काय होत .. आणि आपण नेमका काय करायला हव, हे इथे खूप छान पद्धतीने मांडले आहे ..
काय होत?
१. व्यक्तिगत आयुष्यात काय किंवा सामाजिक जीवनात काय निर्णय घेणे कधीच सोपा नसते. पण नुसत्या विचारांचे पोकळ इमले बांधून तरी काय कामाचे.
२. सतत खूप विचार करत राहिलो कि आपल्या डोक्यात सारे विषय जिवंत आहेत असा वाटत, पण प्रत्यक्षात त्या विषयानुरूप कामाची काहीच अंमलबजावणी काहीच होत नाही. अनेकदा अति विचार केल्याने त्या विचारांची धार कमी होते आणि मग रस्त्यात अपघात झाला तर काय या भीतीने चालण्याची सुद्धा भीती वाटते.
हेच सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातही होते.
३. आपल्या अवती-भोवती अनेक प्रश्न आहेत. इतके आक्राळ -विक्राळ प्रश्न कि त्यांच्या पुढे आपण कसे टिकणार आणि काय करणार असा हताश प्रश्न पडतो. हतबल वाटत. आकाशच फाटलंय कुठून शिवायला सुरुवात करणार असा प्रश्न पडतो. आपण एकटेच काय करू शकणार असा हि वाटत.
४. काही जणांना नेमक माहीतच नसता आपल्या अवती भोवतीचा जग. मग बसल्या जागी सिस्टीम ला शिव्या घातल्या जातात, पण सिस्टीम काही करीतच नाही .. रद्दड सिस्टम बदलायला पअहिजे असा दिन्धोरा पिटला जातो पण त्या सिस्टम शी कधी दोन हात केलेच जात नाही. नुसत्या पोकळ वाचाळ चर्चा.
त्या चर्चेतून वाढतो गोंधळ ..
५ कुणीतरी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यावी असा वाटत; पण आशी तयार उत्तरे मिळत नाहीत. दुसर्याने स्वतः साठी शोधलेली उत्तरे आपल्याला लागू पडत नाहीत,आणि उरतात फ़क़्त डोक्यात थैमान घालणारे विचार आणि हताश चिडचिड.
काय करता येईल ?
१. विचारांची लड लावणं बंद करा आणि थेट वस्तुस्थितीला भिडा
२, आपला मार्ग शोधण्याचा एकाच सोपा मार्ग म्हणजे जे करावा वाटते ते करून पहा ...
३. एकदा ते करून पहिला कि आपल्याला कळत कि या कामातल्या नेमक्या अडचणी काय आहेत? ते काम करायला आपल्याला आवडतंय कि नाही ?
४. त्यातल्या अडचणी काय नेमके प्रश्न काय?
५. त्या अडचणी सोडवून प्रश्नांची तड लावण आपल्याला जमणार आहे का?
६. जो पर्यंत प्रत्यक्ष एखादा काम करून पाहत नाहीत तो पर्यंत त्या कामातली गम्मत आणी त्या कामातला त्रास दोन्ही आपल्याला कळत नाही .
७. आपल्या जीवनाचा ध्येय शोधायचा असल्यास त्या वाटेवरून एकदा थोडा तरी चालून पाहायला हवा. अनेकदा आपल्याला स्वतःच्याच क्षमतांचा अंदाज नसतो ; त्या मुळे क्षमतांचा कस लाऊन पाहन यासाठीही प्रत्यक्ष कृतीला पर्याय नाही.
८. समाजातील प्रश्नांविषयी अशीच पोकळ कळकळ वाटण्यात काही हाशील नाही, तुम्हाला जो प्रश्न सतावतो, त्या प्रश्नाला जाऊन भिडा, त्यातला खाचाखोचा शोधून पहा, माणसांना भेट, त्यांचा जगन अनुभवून नाही तर त्यांच्या सारख जगुन बघा, तर कदाचित खर जग आपल्याला स्वच्छ नजरेने दिसू लागेल.
९। मग हा प्रश्नच उरणार नाही कि मी देशासाठी, समाजासाठी, आपल्या माणसांसाठी काय करू? तुमचा उत्तर तुम्हालाच सापडेल, दुसर्या कोणालाहीविचारायची गरज पडणार नाही, तुम्हालाच तुमचा मार्ग सापडेल आणि तुमच्या जगण्याच आनंददायी समाधानही
साभार : मैत्र परिवार
अमोल सुरोशे
No comments:
Post a Comment