गेले २ दिवस वर्तमानपत्र हातात घेताना खूप विचारांचा गोंधळ सुरु होता म्हणून काही तरी लिहावा म्हनल।
मुंबई,ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे म्हणून किमान ३५ जागा ह्या आमच्या साठी राखून ठेवा अशी खुळचट मागणी कॉंग्रेस चे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे, संजय निरुपम एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी हि असल्या प्रकारची भाषा बोलणे म्हणजे परत एकदा जुन्या जखमांना ताजं करण्यासारखा आहे.
खरोखरच मला कमाल वाटते त्यांनी केलेल्या हिम्मतीची.
त्यांची हि हिम्मत कशी झाली? कधी विचार केलाय का आपण.. का अजून हि गप्प आहात.
१०६ हुतात्म्यांचा बळी घेऊन दिल्लीश्वरांनी आपल्याला आपल्याच हक्काची मुंबई दिली, नव्हे आम्ही ती हिसकावून घेतली, मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हणले जाते. या मुंबई च्या उभारणी मध्ये आमच्या मराठी माणसाने आणि मराठीवर प्रेम करणारे सर्व जाती -धर्म आणि भाषेचे लोक ह्यांनी वाहिलेल्या रक्ताची आणि घामाची ह्यांची पावती म्हणून हि मुंबई या सबंध देशासमोर एक फार मोठे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून समोर आले आहे .
आम्हा मराठी बांधवांनी नेहमी आलेल्या पाहुण्यांचे आगदी मनापासून स्वागत केले, त्यांना आपल्या घरामध्ये जागा दिली, त्यांना पोसले . पण आज त्यातलेच काही लोक फ़क़्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी साक्षात मराठी च्या विरोधात उभी राहिली आहेत.
ज्या अर्थी हे बाहेरचे काही मुठभर युपी - बिहारी नेते ह्या साठी जबाबदार आहेत तेवढेच आपण हि या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.
गेली ४ वर्षे मी या मुंबई मध्ये राहतो, पण एक सांगतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा म्हणले होते .." मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे , पण मुंबई मध्ये कुठे हि महाराष्ट्र दिसत नाही" तीच भावना माझी हि झाली. का बोलले ते असे? तेव्हा मराठी लोक नव्हते का? होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान! तेव्हा झोपलेला हा आमचा मराठी माणूस आज पर्यंत गाढ निद्रिस्त अशा अवस्थेत पडला आहे.
आम्ही कधी आमच्या मागील चुकांपासून काही शिकणार आहोत. मागे माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आम्हाला आमच्या स्वाभिमानाची जान करून दिली आता त्याच साठी शिवसेना आणि राज साहेब ठाकरे आप आपल्या परीने लढत आहेत. पण आम्हाला नेहमी का अशी कोणी तरी चिथावत ठेवण्याची गरज लागते. आम्हाला काहीच कळत नाहीये का, हि जबाबदारी फ़क़्त काही राज ठाकरे आणि त्यांच्या सारख्यांची आहे का .. ते कोणा साठी लढत आहेत .. आपल्याच साठी ना .. मग आपण असा कित्ती दिवस असे सर्व गोष्टींपासून स्वतः ला दूर ठेवणार आहोत.
माझे तमाम मराठी मनाच्या लोकांना आवाहन आहे कि जागे व्हा ... या पुढील काळ खूप कठीण राहणार आहे, खूप मोठे षडयंत्र रचले जात आहे, राजकारणाच्या नावाखाली पुन्हा एकदा मराठी माणसाचा बळी देण्यात येईल आणि आपण हि मुंबई कायमची आपल्या हातातून घालवून बसू, मग पुन्हा "आपल्याला काय त्याचे" म्हणणारे सुद्धा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत.
स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाच्या अधिकाराची भाषा आमच्या महाराष्ट्राला शिकवण्यात येत आहे, पण आम्ही कधी हि कोणाचे अधिकार मारणार नाहीत पण प्रसंगी आमच्या हक्कांसाठी मरायला हि मागे पुढे पाहणार नाहीत.
देशाच्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न एकट्या मुंबई शहरातून जातो .. आपल्या देशामध्ये एकूण कर भरणाऱ्या पैकी एकट्या महाराष्ट्रातून जाणारा कराचा वाटा हा सर्वात जास्त आहे याचे कारण म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या शहरामध्ये इमाने इतबारे काम करणारा आमचा मराठी माणूस. उद्या जर हि मुंबई महाराष्ट्र पासून तोडली गेली ना मग आमचे हेच दिल्लीश्वर (उत्तरे कडील काही भ्रष्ट नेते) या महाराष्ट्राच्या तोंडाला कायमची पाने पुसल्याशिवाय राहणार नाहीत
एकीकडे मुंबई मध्ये परप्रांतीयांना मोफत घरांचे वाटप होत आहे, झोपडपट्ट्या कायदेशीर ठरवल्या जात आहेत ...आणि याच आमच्या महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये गरीब आणि सामान्य माणसांचे शोषण होत आहे. कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत कसल्या हि प्रकारच्या ठोस योजना नाहीत, आणि इथे फ़क़्त मतांच्या राजकारणासाठी हे भडवे रोज नवीन एक एक खेळ मांडत आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्र ह्या दोन गोष्टींचा कधीच वेगवेगळा विचार करता येणार नाही .. हे सत्य असून ती काळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबई वर आणि मराठी भाषेवर आलेले हे संकट आपल्या सर्वांना मिळूनच दूर करावे लागेल. हे संकट कुठल्याही प्रकारच्या राजकारणाने नाही तर समाजाच्या एकत्र ताकदीने दूर केले पाहिजे. मराठी माणसाने फ़क़्त आणि फ़क़्त मराठी मधेच बोलायला पाहिजे, "ह्याने काय होते त्याने काय होते, हि मानसिकता आता सोडावी लागेल ..कोणी म्हणताय म्हणून उसने अवसान आणलेला तथा स्वार्थी मराठी बाणा आम्हाला आता नकोय , आम्हाला गरज आहे आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या अस्मितेवर गंभीर पणे विचार करणाऱ्या माणसांची, त्या साठी प्रामाणिक पणे झटनार्यांची . तेव्हाच पुन्हा एकदा सर्वांना सामावून घेणारा पण स्वतःची अस्मिता कधी हि न मिटू देणारा एक महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जगासमोर एक आदर्श म्हणून उभा राहील.
मराठी भाषा आणि मराठी अस्मिता फ़क़्त निवडणुकीचा मुद्दा नाहीये .. हे हि आपण लक्षात ठेवा.
ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व .. आम्हाला फ़क़्त आमच्या प्रश्नांशी जुडलेल्या नेत्यांनाच द्यायचे आहे. उठ-सूट मतांची झोळी घेणून फिरणाऱ्या भिकाऱ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्या ..
या महाराष्ट्राला परत ते तेजस्वी रूप देण्यासाठी पुन्हा एकदा .. उठ मराठ्या उठ ..
जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे
(मी कोणत्याही राजकीय पक्षाशी सालाग्नित नाहीये, नाही कोणाच्या विचारांनी प्रभावित होऊन लिहिले आहे .. पण एक मराठी म्हणून जे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि जे माझ्या मनाला वाटले तेच इथे व्यक्त केले. बाकी तुम्ही सर्वस्वी जाणते आहातच, तेव्हा आपणच आता विचार करावा )
2 comments:
Sahi ahe Raje. He sale uttar bhartiy nete mhanje jya thalit khatat tethech ghan karnarya paiki ahet. are hyana swatach ghar ghan karnyachi savay ahe te apalya gharachi kay kalaji karnar. Pan Aplya Maharashtratil rajakarani lokana kadhi umgel dev jano.
kharach ata marathi mansala jaga karayachi vel aali ahe...asha lekhanmadhun he kayash nishchitach hoil.....ani kharach hya paristhitila apanach jababdar ahot...
pan ata vel ahe jaaaaaga vyayachi..apali asmita japayachi....
Post a Comment