सेक्युलर आणि जातीयवादी, धर्माध या असल्या वैचारिक वादातच आपली १० वर्षे निघून गेली. आणि त्याचा फायदा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाच झाला. आमच्या दृष्टीने एक वाघ, तर दुसरा वाघोबाच! जातीयवाद्यांचा फायदा होता कामा नये, म्हणून ज्यांनी निवडणुका लढवल्या अथवा नाही लढवल्या ते सगळे संपले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरचा उरला सुरला वैचारिक अंकुशही नष्ट होण्यात झाला.
म्हणूनच आता तरी चांगल्या गोष्टी घडवून आणायच्या असतील तर लोकांसमोर सक्षम पर्याय हवा. तरच दबाव गट निर्माण होऊ शकतो. जनतेला लुटणारा दरोडेखोर सेक्युलर असावा की जातीयवादी असावा; हा प्रश्नच निर्थक आहे. शेवटी दरोडेखोर तो दरोडेखोरच ना! म्हणूनच या दरोडेखोरांपासून राज्याला वाचवायला हवं.

आम्ही एकच म्हणू:
बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत, प्रस्थापितांनी आपल्या मोठ्या जहाजा सांभाळाव्यात!
अधिक लोकप्रभावर वाचा-
http://www.loksatta.com/lokprabha/20090911/tea.htm
No comments:
Post a Comment