एवढ्या लवकर आमची डोकी थंड कशी झाली .. अरे पेटून उठा एकदाच ...
परवा न्यूज़ पेपर वाचत असताना एक बातमी पहिली,
मोहम्मद अफजल कसाब .. ह्याची विशेष न्यायालयातील सुनावणी.. विशेष कोर्ट .. विशेष सुरक्षा .. आणि कासाबच्या काही मागण्या .
वाचून डोळ्या समोर तो क्षण आला .. 26 /11 मुंबई, भारताची आर्थिक राजधानी .. , टीवी समोर बसून याच डोळ्यांनी माझी माया नगरी जळताना मी स्वता पहिली.
हजारो निरपराध लोकांच्या त्या किंकाळ्या .. बायका पोरांचे रक्ता मधे पडळेले मुडदे .. हे सर्व बघताना आयुष्यात प्रथमच खूप असुरक्षितता जाणवली.
पण मला अभिमान वाटतो तो माझ्या त्या सैनिकांचा .. त्या आमच्या करकरे, कामठे, सालस्कर आणि अतिरेकंच्या गोळ्या आपल्या छाती मधे झेलणारा ओळांबे .. लढलेला तो प्रत्येक सैनिक आमच्या जिवा साठी आगदी पोट तिडकिने लढत होता जीवाची पर्वा न करता .. ! त्यांच्या अथक प्रयत्ननेच एक आतन्कवादी आम्ही जिवंत पकडू शकलो; त्याचा नाव होता कसाब.
पण आज अचानक हे सर्व प्रसंग पुन्हा डोळ्या समोर येण्याचा कारण म्हणजे आमच्या भारतात त्या कसबे चे चालले लाड आम्ही स्वता न्यूज़ आणि मीडीया च्या माध्यमातून पुन्हा बघत आहोत. त्याचा तेकोर्ट मधे कुत्सित पणे हसने.. जणू आमच्या सर्वांच्या छातडावर पाय ठेवून त्या अफजल खाना सारखा आमच्या दुर्बलतेवर तो हसत आसतो.
ज्या दिवशी या आमच्या देशावर हा आघात झाला ना त्या ही पेक्षा वेदना त्या " हराम-खोराचे" ते हास्य बघून झाल्या.. आम्हाला आमच्याच मधे आसलेल्या भितऱ्या, .. षन्ढ माणसाची जानिवाच जणू तो करून देत होता .
काय चलाय हे ह्या देशात? आज आमच्या छातडावर अतिरेकी घुसून आमच्यावर वार करत आहेत .. लाखो करोडो लोकांच्या समोर आमचे जीव घेत आहेत आज त्यानाच आम्हाला एका विशेष अपरध्या सारखा संभाळावा लागतय. त्याचे चोचले पुरवले जात आहेत .. तो या आधीच आमच्या इजजतीशी खेळला .. आणि आता पण कोर्ट मधे तेच करत असतो. हे असेच चालतराहणार आहे का ??
आम्ही अजुन किती दिवस आसेच मेलेल्या मुडद्य़ा सारखे पडून राहणार आहोत ..? आमच्या मधला स्वाभिमान संपला आहे का ..? का एकाच हल्ल्या मधे आम्हाला आमचे बाप दिसले? नेमका काय होत आहे .. ? जे त्या अफजल गुरू चा झाला तेच या कसाब चा पण करायची वाट आपण बघतोय का ?
आरे ह्या देशाच्या राजकारण्यांनी आपली लाज सोडली म्हणणारे आम्ही .. कुठे गेली आता आपली लाज, शरम ? ह्याना सोडा, आता गरज आहे ती तुम्हा आम्हा सामान्य नागरीकाणा पेटून उठायची .. अन्यथा ह्या देशावर आशेच हल्ले हे होतच राहतील; एक दिवस आमच्याच घरा मधे घुसून आमच्या आया बहिणी बाटवल्या जातील .. यवणी सत्ता पुन्हा एकदा आमच्या डोक्यावर राज्या करेल ..जर आज ही आमचे मस्तक पेटले नाही ना तर ह्याच आमच्या मस्तकावर रोज एक बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या ह्याच थंड डोक्याचे हजार तुकडे केल्याशिवाय राहणार नाही .. आणि तेव्हा आशेच हजारो कसाब आमच्या कडे बघून पुन्हा हसतील.
ह्या माती मधे जन्माला येऊन आम्ही काय केले ..?नेभळटा सारखे सारे आयुष्या जगलो .. आता काय घाबरत घाबरातच मरणार का ?
माझी सर्व भारतियांकडून एकाच अपेक्षा आहे सार्यनी आपला धर्म, जात, भाषा, पक्ष, संघटना विसरून केवळ आपण भारतीय म्हणून या संकटाचा सामना केला पाहिजे .. त्या कसाब चा धर्म कोणता ह्या पेक्षा त्याचा हेतू काय होता हे लक्षात घेतले पाहिजे. आपण सर्वांनी मिळून सरकारवर दबाव आणला पाहिजे की शंभर दिवसांच्या आत त्या कसाबला आणि त्याच्या सारख्या सबंध जगातील लोकाना दाखवून दिले पाहिजे की आमच्या देशाच्या अस्मितेवर घाला करणार्याचे आम्ही काय हाल करू शकतो. आवश्यक असणारा कायदा अथवा काही पण करून त्या कासबचे चोचले आता बंद केले पाहिजेत. आपल्याला ही कठोर भूमिका घ्यावीच लागणार आहे अन्यथा आमच्याच भुमी मधे आम्हाला एका अश्रिता सारखे राहावे लागेल ..
याच महाराष्ट्राच्या माती मधे असाच तो औरंग्या आला होता .. शेवटी त्याला ह्याच दक्खनेतल्या माती मधे गाडुनच ही भूमि शांत झाली .. तसाच या पाकड्या कसाब ला ह्याच महाराष्ट्राच्या माती मधे जोवर आम्ही गाडनार नाहीत तोवर ही आमची माय भू शांत होणार नाही .
मला खात्री आहे आज आमचे हे पेटलेले मस्तकच सार्या जगाला दाखवून देईल आमची एकात्मता .. अखंडता आणि आमचे निस्सीम राष्ट्रप्रेम.
त्या कसाब ला जिवंत ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच, त्याने हजारो नागरिकांचे बळी तर अगोदरच घेतेले आता तो असाच जिवंत राहिला तर तोच कसाब आमच्या या देशाचे धर्माच्या नावाखाली अजुन हजारो तुकडे करील, तोच कसाब आमच्या न्याय व्यवस्थेचा बळी घेईल .. तोच कसाब आमच्या सहानशिलतेचा देखील अंत करेल !
मी केन्द्र सरकारला मागणी करतो की त्या कसाब ने तर हजारो नागरिक मारलेच पण त्याला जिवंत ठेवून आपल्या देशाचे हजारो तुकडे होण्या पासून वाचावा.
माझ्या तशा माझ्या सारख्या हजारोंच्या मना मधली ही तीव्र भावना आणि बर्याच दिवस पासून चाललेली खळबळ आपन सर्व समजुन घेताल एवढीच तुमच्या कडून अपेक्षा करतो ..
जय हिंद जय महाराष्ट्र .. !
जय जिजाऊ .. जय शिवराय !!
अमोल सुरोशे ..
जिजाऊ.कॉम
Blog by Amol Suroshe is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
Friday, June 19, 2009
Wednesday, June 3, 2009
Abhinandan sachina ani Arunachal Pradesh
Sachin Tndulakar:
http://beta.esakal.com/2009/06/03234118/mumbai-sachin-tendulkar-helpin.html
Arunachal Pradesh:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4614659.cms
http://beta.esakal.com/2009/06/03234118/mumbai-sachin-tendulkar-helpin.html
Arunachal Pradesh:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4614659.cms