Thursday, April 30, 2009

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन......

महाराष्ट्र ज्या नावतच या राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते...

हा महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबांची ओवी पासून बनलेला
तुकोबांच्या अभंगमधे तल्लीन होणारा
संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा, यांची संत भुमी आसलेला
साई बाबा.. शेगाव चे गजानन महाराज अथवा स्वामी समर्थ या दैवी माणसांची देवभूमी आसलेला महाराष्ट्र

संत गाडगे बाबा ते महात्मा ज्योतिबा फुले या सारख्या समाज सुधाराकाचा महाराष्ट्रा
बाबा आमटे, विनोबा भावे , सारख्यनी आपले अखे जीवन ज्याला वाहीले आसा महाराष्ट्रा

या महाराष्ट्रणेच आम्हाला स्वाभिमान शिकवला ..ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपर्यातून एक स्वातंत्र्याचा किरण जिजाऊ च्या पोटी जन्माला आला ..
या मातितच छ्त्रपतींचा जन्म झाला ..आसा महाराष्ट्र..

ज्याने आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले .. .त्या शिवबाचा महाराष्ट्र
धर्मवीर संभाजीच्या पराक्रमाणे दिल्ली ला ही घाम फुटायला भाग पडणारा माझा महाराष्ट्र

कोटी कोटी दलितांचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी .. कर्मभूमी असलेला महाराष्ट्रा ..

फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्रा .. शिवबाच्या शक्तिचा महाराष्ट्र .. संत परंपरेच्या भक्तीचा आसा माझा महाराष्ट्रा ......

माझा महाराष्ट्र ..... आज महाराष्ट्र दिन.. या दिवशी त्या 106 हुतात्म्याना विसरून कसे चालेल .. ज्यानी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा महारष्ट्रा एक संध ठेवला .. त्या सर्वाना .. आणि या महाराष्ट्रा साठी लढलेल्या .. मराठी संस्कृती च्या उत्कर्षा साठी झीजलेल्या त्या प्रत्येक महा मानवास विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वाना या महाराष्ट्रा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

मित्राणो भारत 150 वर्षे गुलामगिरी मधे होता .. महारष्ट्रा तर 1 मे 1960 साली पूर्णपणे स्वतन्त्र झाला .. इंग्रज गेले पण आम्ही गुलाम गिरी मधून मुक्त झालो का??? .. आधी त्यांचे गुलाम होतो आणि आज विदेशी संस्कृतीचे .. आपल्या डोक्याचा वापर ना करता सर सकट आपण परदेशी संस्कृती अंगिकारण्यातच फार मोठा पुढारले पणा सिद्धा करत आहोत.

आपली संस्कृती काय आहे ? आपल्या देशाला "तिसरी दुनिया " का म्हणल जायच? कारण या देशा मधे जे सार्‍या जगात मिळते ते एकट्या या देशा मधे भेटते .. आणि आज आपणच आपल्या देशाच्या या शाक्तीस्थाणाणा विसरून चाललो आहोत.. आज आर्थिक मन्दि मुळे बाजारात आसलेला फूगा आगदी सहज पने फुटून गेला .. लाखा लाखा च्या गप्पा करणारे एका दिवसा मधे जमिनीवर आले .. का झाले आसे ?? नक्कीच ही परिस्थिती बदलणार आहे पण पुढे काय ?? हा प्रश्न आपल्या डोक्यावर राज्य करणार ना .. हा प्रश्न घेउनच आपण पुढे पण आसेच चालत राहणार का? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्‍न आपण नाही तर कोण करणार , आयुष्यात बर्‍याच वेळेस आपल्या भविष्या काळातील प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या भूतकाळात मिळून जातात... आणि आमचा भूतकाळ एवढा तेजस्वी असताना आम्ही भविष्यातील संकटची काळजी कशाला करायची ..आपल्या देशाची .. आपल्या राज्याची शक्ति स्थाने ओळखून आपल्याला त्या क्षेत्रातही आपले कार्या सुरू करावे लागणार.


आमच्याच लोकाना आज आपल्याच संस्कृतीचा ना अभिमान आहे ना त्याची काही किंमत आहे .. याच महाराष्ट्रा मधे आम्हाला आज खाली मान घालून जगण्यची सवय लागली आहे .. स्वता ला त्या शिवबाचे वारसदार सांगणारे आम्ही .. आज प्रत्येक वेळी या काळातल्या अफजल रूपी सैतान गणिमाकडून शिकस्त खात आहोत.


आज ज्या रायगडा वर स्वराज्याचा सुवर्णकाळ बघितला आज तिथेच त्या रायगडलही लाज वाटेल आसे कर्म आमच्यातलेच काही लोक करत आहेत... जाऊ तिथे पिऊ' असा खाक्या असलेल्या दारुड्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यपावन रायगडाचीही विटंबना सुरू केली आहे...

महाराष्ट्र धर्म टिकवणे तो वाढवणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. आपली भाषा .. अमृताचे पैजा जिंके आशी मराठी भाषा .. ती टिकली तरच आमची संस्कृती टिकेल .. आज आपण या मराठीच्या उज्वल भवितव्या साठी एक साथ प्रयत्‍न करूया .. या महाराष्ट्राचा आसलेला मराठी चेहरा कायम ठेवायचा आसेल तर आपल्याला आता जागे व्हायलाच हवे.

या उज्वल इतिहासाची साक्ष देणार्‍या महाराष्ट्रा मधे माझा जन्म झाला ह्याचा अभिमान आपल्ल्या प्रत्येकाला असला पाहिजे ..

परप्रांतीयांचा धसका घेण्या पेक्षा .. स्व प्रांतीयाणा त्यांच्या मराठी बाण्याची जाणीव करून द्यायची गरज आज आहे.

चला तर उठा मग .. घेवुया शपथ .. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची...

गर्व असु द्या आपण महाराष्ट्रीय असण्याचा .. गर्व आसु द्या आपल्या मराठी भाषेचा ..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

जय महाराष्ट्र --- अमोल सुरोशे

Good Move, they have started thinking...

Nasscom encourages techies to work for NGOs

At a time when job insecurity is at its peak, IT body Nasscom has introduced schemes, to lure the techies towards voluntary works with non-governmental organizations (NGOs). It has launched a 'volunteer' program to help IT/BPO employees who are interested in doing voluntary work find the right fit. .....
More news at : siliconIndia

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे

आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं
मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी
महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली.
औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती. लालाजींच्या अंगावर
यमदूतांच्या लाठया बरसल्या, तेव्हा इंग्रज साम्राज्याच्या शवपेटीवर खिळे
ठोकणारे कैक मर्द निपजले... मग आत्ताच का सगळं शांत शांत? आमच्या
श्रध्दास्थानांवर आघात होतात, आणि आम्हालाच सगळे म्हणतात 'शांत रहा, शांत
रहा'. जाहीरपणे आम्हाला बांगडयाच भरायला सांगितले जाते. का?

आम्ही काय नेभळट आहोत का? की आम्ही दूधखुळे आहोत - उगी उगी हं बाळा, तुला
नाय कोनी माल्लं, गप गप... असं म्हटलं की आम्ही गप्प! हाताची घडी तोंडावर
बोट?

आम्ही जवान आहोत, मर्द आहोत... रक्तात शिवाजी सळसळतो आमच्या, 'शिका,
संघटीत व्हा, संघर्ष करा' म्हणणारा भीम सळसळतो! आमच्या हातात भवानी आहे,
पण डोळयावर पट्टी आहे. आम्हाला शत्रू कोण, हेच कळत नाही. गनिम कावा साधून
जातो, आणि मग आम्ही मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढतो. असल्या भेदरट
मेणबत्त्यांच्या उजेडात दुष्मन दिसत नाही. त्यासाठी डोक्यात उजेड पडावा
लागतो आणि छाती निधडी असावी लागते. आमच्यात आणखी एक प्रकार आहे. राग आला
की, आम्ही शेजार पाजारच्यांना ठोकून काढतो, दंगे करतो. खूप भुई थोपटतो पण
साप मरत नाही.

मीडिया काहीही सांगतो, आणि आपण ऐकतो? कोणी म्हणतं इस्लामी अतिरेकी, तर
कोणी म्हणतं दहशतवाद्याला धर्म नसतो... सुटका झालेल्या दोन तुर्की
नागरिकांनी सांगितलं, की आम्हाला अतिरेक्यांनी आमचा धर्म विचारला, आम्ही
मुसलमान म्हणून आम्हाला सोडले, सोबतच्या तीन आर्मेनियन ख्रिस्ती महिलांना
ठार मारले. पकडलेला अतिरेकी सांगतो की, मी मदरशात शिकलो. आमचे
गृहमंत्रालय म्हणते, की उत्तर सीमेवर मदरसे वेगाने वाढतायत... हे सगळं
काय आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. माझे मुसलमान मित्र-मैत्रिणी
आहेत, ते अतिरेकी नाहीत. आमचे लाडके माजी राष्ट्रपती, आमचे गायक,
संगीतकार, खेळाडू, परमवीरचक्र मिळवलेले शहीद सैनिक - हेही मुसलमान आहेत.
पण ते जिहादी नाहीत... मग हा जिहाद काय आहे, मदरसे काय आहेत, या
विषवल्लीचं मूळ कुठे आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत.

उत्तरं मागण्याचा अधिकार हे लोकशाहीतले पहिले हत्यार आहे. आहे ना
खुमखुमी? मग उचला हे हत्यार!

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी इस्राएलच्या खेळाडूंची ऑलिंपिक मध्ये हत्या झाली
होती. पुढच्या दोन वर्षात ही हत्या करणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला
जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढून इस्राएलच्या कमांडोंनी ठार मारले.
दुसऱ्या महायुध्दात हजारो ज्यूंची हत्या करणाऱ्या ऍडोल्फ आइकमनला
इस्राएलच्या हेरांनी परदेशातून शोधून उचलून आपल्या देशात आणला,
त्याच्यावर खटला चालवला, आणि त्याला देहदंड दिला. टीचभर देश आहे इस्राएल.
पण त्यांचा राष्ट्रीय स्वाभिमान जागा आहे. कोण आहेत त्यांचे नेते? आणि मग
आमचेच असे कसे?

आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८
पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही... मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच
मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची!
लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो. आम्हाला
स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या
नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे.

शांत रहा, शांत रहा... असं कोणीही सांगितलं तरी गप्प बसण्याची वेळ नाही
आता. लोकशाहीतली हत्यारं उचलून लढलं पाहिजे. सूडाच्या अग्निकुंडात आपल्या
अभिमानाची आहुती पडली आहे. संसदेवर हल्ला झाला आहे, ताजची राख झाली
आहे... इतक्या आहुती देऊनही जर स्वाभिमानाची भवानी जागी होणार नसेल, तर
आमचे राष्ट्र नष्टच होणार असेल.

शंभर शिशुपालांचे हजार अपराध भरलेत, जनतेतल्या जनार्दना - उठ!

Sunday, April 12, 2009

आपल्याला हे माहीत असावे!

रुस्तुम सुनील तांबे

'पवारांची पंतप्रधानकी' हा लेख 'संवाद' पुरवणीत गेल्या रविवारी प्रकाशित झाला होता. शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हित केले नाही, असा ठपका त्या लेखात होता. मात्र, शेतीमंत्री या नात्याने पवार यांनी केलेली कर्तबगारी भारतीय शेतकऱ्याचा कधी नव्हे इतका लाभ करून देते आहे, असा युक्तिवाद करणारे पाध्ये-राजवाडे यांच्या लेखाला देण्यात आलेले हे उत्तर.

................

रमेश पाध्ये व अशोक राजवाडे या दुकलीने 'पवारांची पंतप्रधानकी' हा लेख मटात लिहिला आहे. तो शेरेबाजीने भरलेला होता. मात्र, काही ठिकाणी निवडक आकडेवारी आणि संदर्भ देऊन लेखाला विश्वासार्हता आणण्याची फसवा प्रयत्न केला आहे. त्यांचा खोटेपणा सांगणे गरजेचे आहे.

राजवाडे आणि पाध्ये डाव्या विचारांचे अर्थतज्ज्ञ आहेत. शेतमालाला वाजवी भाव मिळाल्यास महागाई वाढते, पर्यायाने देशातील गरीब जनतेची नाडवणूक होते, असा सिद्धांत पाध्ये यांनी डाव्या विचारांच्या नियतकालिकांमध्ये अनेकदा मांडला आहे. मात्र, लेखक स्वत: माहिती गोळा करणं सोडून कसं खोटं लिहितात, याचं पहिलं उदाहरण पाहा. ''पी. साईनाथ यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या मते शेतकऱ्याला कापसाचे बियाणे पूवीर् १० रुपये किलोने मिळायचं; पण आता बीटी कॉटन बियाण्यासाठी त्याला किलोला चार हजार मोजावे लागतात. असं बियाणं शेजारच्या आंध्र प्रदेशात निम्म्या किमतीला मिळतं.'' गवताचं बियाणंही दहा रुपये किलोने मिळत नाही. गवताच्या बियाण्यांचे भाव सरासरी ६०-१०० रुपये प्रतिकिलो आहेत. बीटी कापसाचा प्रसार होण्यापूवीर् शेतकरी कापसाचे संकरित बियाणे ४०० रुपये किलोने विकत घ्यायचे. १० रुपये किलो सरकीचा भाव होता. तिचा बियाणे म्हणून क्वचितच वापर व्हायचा. तसेच, सध्या आंध्र व महाराष्ट्रातील शेतकरी बीटी बियाण्यासाठी एकच किंमत मोजत आहेत. आंध्रने कायदा करून बीटी बियाण्याची किंमत ७५० रुपये प्रति पाकीट (४५० ग्रॅम) निश्चित केली. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने कायदा केला. २००८ च्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी १ किलो बीटी कापसाच्या बियाण्यासाठी १६६७ रुपये खर्च केले. चार हजार नव्हे. बियाण्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा राज्य सरकारांना असलेला अधिकार त्यांनी वापरला. पवार केंदात शेतीमंत्री असल्याने त्यांनी राज्य सरकारांच्या कामात ढवळाढवळ करावी, असे लेखकांना म्हणायचं आहे का?

लेखक म्हणतात ''आयात कापसाचे उत्पादनशुल्क वाढवून शेतकऱ्यांचे हितसंबध जपावेत. असं पवारांना वाटत नाही.'' कापसावर आयातशुल्क लावल्याने इतर देश स्वस्त कापूस भारतात डम्प करणार नाहीत, याची काळजी घ्यायची जबाबदारी केंद सरकारची आहे. पवार शेतीमंत्री असताना सरकारनं ती व्यवस्थित पार पाडली. पवार शेतीमंत्री असताना कापसाचं विक्रमी उत्पादन तर झालंच आणि विक्रमी निर्यातही (२००७-०८ मध्ये ७.५ दशलक्ष गाठी) झाली. पवार मंत्री झाल्यानंतर कापसाची किमान आधारभूत किंमत ४० टक्क्यांनी वाटून २५०० रुपये क्ंविटल (मिडीयम स्टेपल) झाली. खुल्या बाजारातील दर यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे २००८-०९ च्या हंगामात 'सीसीआय', 'नाफेड'सारख्या सरकारी संस्थांना मोठ्या प्रमाणावर कापूसखरेदी करावी लागली. राज्यातील ९० टक्के कापूस या संस्थांनी खरेदी केला. खरेदीचा कालावधी सरकारी संस्थांनी दीड महिन्याने वाढवला. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत आहे. पवारांच्या कारकिदीर्त गव्हाची आधारभूत किंमत ७१, सोयाबीनची ६१, तुरीची ४७, तांदळाची ५५ व उसाची ११ टक्क्यांनी वाढवण्यात आली. स्वातंत्र्यानंतर कुठल्याही सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमती या प्रमाणात वाढवल्या नाहीत. गव्हाची आयात या चावून चोथा झालेल्या विषयाला या दुकलीने केवळ टीका करण्यासाठी हात घातला आहे. देशात २००५-०६ मध्ये गव्हाचे उत्पादन घटलं. (६९.३५ दशलक्ष टनापर्यंत) गरिबांना सरकार स्वस्तात गहू देतं. तसंच, संकटासाठी बफर साठा करतं. उत्पादनात घट झाल्यानं सरकारी संस्थांना पुरेसा गहू खरेदी करता आला नाही. खासगी कंपन्यांनी चढा दर दिला. यामुळे गहू आयात करावा लागला. त्याच वषीर् जगभर गव्हाची निर्यात करणाऱ्या ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडला. यामुळे जगभर गव्हाचा भाव कडाडला व चढ्या भावाने आयात करावी लागली. मात्र, आपण प्रथमच गव्हाची आयात केली नाही. त्यापूवीर्ही मान्सूनने दगा दिल्यावर आपण गहू आयात केला होता. पवारांनी पुढच्याच वषीर् गव्हाच्या आधारभूत किमतीत भरघोस वाढ केली. गव्हाचे विक्रमी म्हणजे ७८.५७ दशलक्ष टन उत्पादन झाले. आज सरकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला माल ठेवायला जागा नाही. सरकारी कंपन्यांनी २००८ मध्ये २२.६ दशलक्ष टन गहू विकत घेऊन विक्रम केला. सरकारी गोदामात गेल्या हंगामात १ मार्चला १५.३ दशलक्ष टन गहू होता. यंदा सरकारी कंपन्या २४ दशलक्ष टन गहू खरेदी करण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतला दर किमान आधारभूत किमतीच्या खाली असल्यानं खासगी (कारगिल, आयटीसी) कंपन्या गहू खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. ही ताजी आकडेवारी देण्यात पाध्ये व राजवाडे यांना काय अडचण होती?

लेखक म्हणतात 'पवारांना शेतकऱ्यांचे कैवारी कसं म्हणावं?' मात्र, त्यांच्या निर्णयांमुळे पवारांची नोंद शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून झाली आहेच. पवार मंत्री झाले तेव्हा शेतकऱ्याला वित्तसंस्था १६ टक्के व्याज आकारून कर्ज देत. तो दर ६ टक्क्यांवर आला आहे. भाजप हा दर ४ टक्क्यांवर आणण्याची भाषा करत आहे. यात पवारांचा काहीच वाटा नाही का? गेल्या वषीर् व्याजदर १४ टक्क्यांवर पोहोचले. त्या काळातही शेतकरी ६ टक्के दराने कर्ज घेत होता. यंदाही घेईल. याचं श्ाेय पंतप्रधान, केंदीय अर्थमंत्री यांच्यासोबत पवारांनाही दिलं पाहिजे. कर्जाची परतफेड करता आली नाही. म्हणून लाखो शेतकऱ्यांना कर्ज घेणे शक्य नव्हतं. त्यांना सावकारांचा आसरा घ्यावा लागत होता. जमिनी सावकारांच्या घशात जात होत्या. ते आत्महत्या करत होते. (टाटा समाजविज्ञान संस्थेने हायकोर्टाच्या आदेशावरून केलेल्या अभ्यासात ही गोष्ट स्पष्ट झाली.) पवारांच्या पुढाकाराने कर्जमाफी झाल्याने वित्तसंस्थांकडून कर्ज घेण्याचा मार्ग खुला झाला. त्याचे अनुकूल परिणाम येणाऱ्या दिवसात दिसतीलच. पवारांच्या काळात तेलबिया, डाळी, कापूस, साखर, गहू आणि भाताचे विक्रमी उत्पादन झाले.

जगभर अन्नधान्याचे भाव २००८ मध्ये गगनाला भिडले. आफ्रिक्रा खंडात काही देशांमध्ये अन्नधान्यावरून दंगे झाले. जगात गव्हाचा ठोक भाव २४ रुपये किलो असताना देशात तो १२ रुपये होते. जगभर लोकांचा खिसा धान्याच्या किमती वाढल्याने रिकामा होत असताना भारतात लोक निम्म्याहून दराने भात खरेदी करत होते. हे केवळ २००७-०८ च्या हंगामात विक्रमी उत्पादन झाल्याने शक्य झाले. पवारांकडे ग्राहक संरक्षण खातेही आहे. त्यांनी ग्राहक व शेतकरी अशा दोघांनाही खूष ठेवण्याची अवघड गोष्ट शक्य केली.

यावरून पवारांनी कुशलतेने शेतीखाते सांभाळले हे सिद्ध होतं. अन्य राज्यांमधील शेतकरी व बहुजन समाजाचे नेते पवारांबद्दल गौरवोद्गार काढतात, यातच सर्व काही आले. मात्र, काही मराठी माणसांना, त्यातही शहरी मध्यमवर्गाच्या प्रतिनिधींना हे पाहवत नाही. पवारांच्या यशाची पाटी पुसण्याच्या केविलवाणा प्रयत्न ते करतात. या पढीक विद्वानांना ना देशाच्या राजकारणाची जाण आहे, ना पवारांच्या राजकारणाची.

शरद पवार वारसा सांगतात, नेहरू आणि यशवंतराव चव्हाणांचा. या दोन्ही नेत्यांनी राजघराण्यांना लोकशाहीत वा सत्ताकाराणात फार स्थान दिलं नाही. पवार काँगेसमध्ये असताना हेच राजकारण करत होते. पण बहुजन समाजाच्या नेत्याला राष्ट्रीय राजकारणात नामोहरम करण्याच्या काँग्रेसच्या धोरणामुळे पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करावी लागली. त्यामुळे मराठा समाजाला केंदस्थानी ठेवून राजकारण करणं त्यांना भाग पडलं. मराठा सेवासंघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर, 'शिवधर्मा'ची घटना लिहिणारे आ.ह. साळुंखे वा विनायक मेटे यांच्यापेक्षा मराठा समूहाचं नेतृत्व शरद पवारांच्या होती असणं केव्हाही श्ाेयस्कर आहे. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असो किंवा मंडल आयोगाच्या शिफारसी अन्य मागासांना लागू करण्याचा विषय असो वा भटक्या-विमुक्त जातिसमूहाचे प्रश्ान् असोत, महिला धोरण असो पवारांची भूमिका पुरोगामी राहिली आहे.

तथाकथित राष्ट्रीय पक्षांनी बहुजन समाजातील, विशेषत: शेतकरी वर्गातील नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर स्थान देण्याचं नाकारल्याने विचारधारेचं राजकारण मागे पडलं. परिणामी विविध समूहांच्या राजकीय आकांक्षांना सामावणारे नवे पक्ष निर्माण झाले. मायावती, मुलायमसिंग, लालूप्रसाद हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत याच कारणामुळे येतात. महाराष्ट्रातून शरद पवारांचं नाव पुढे येते. निवडणूक निकालानंतर कोणती समीकरणे तयार होतात, यावर काँग्रेस आणि भाजपची मदार आहे. पवार पंतप्रधान व्हावेत की न व्हावेत वा होतील की नाही होणार हा मुद्दाच नाही. दिल्लीच्या राजकाण्राात पवारांचे हात मजबूत करा हे मराठी मतदारांना, त्यातही मराठा समाजाला सांगण्यासाठी पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची घोषणा त्यांच्या पक्षाला करावीच लागते.

इंदिरा गांधींनी मानसिक असुरक्षितेमुळे आणीबाणी लादली. तरीही त्या पंतप्रधानपदाच्या सवोर्त्तम लायक उमेदवार होत्या, याबाबत बहुतेक सर्व विद्वानांचं एकमत होतं. राजीव गांधी बोफोर्स प्रकरणात निदोर्ष ठरले. मात्र क्वात्रोचीला सुप्रीम कोर्टाने दोषमुक्त केलं नाही. क्वात्रोची आणि राजीव-सोनिया गांधी यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, या कारणामुळे राजीव वा सोनिया पंतप्रधानपदाला लायक नाहीत; असा युक्तिवाद कोणी करत नाही. राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या प्रत्येक पैलवानाच्या अंगाला माती लागतेच. पण शेतकरी वा बहुजन समाजातील नेता पंतप्रधानकीच्या शर्यतीत उतरला की काहींचा पोटशूळ उठतो. काँग्रेस हायकमांडने इंदिरा गांधींच्या काळात डाव्या विचारांच्या काही विद्वानांना यशवंतराव चव्हाण, शरद पवार इत्यादी नेत्यांच्या विरोधात लिखाण करण्याची सुपारी दिली होती. रशियातला कम्युनिझम संपला. चीन नावापुरता कम्युनिस्ट राहिला. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची समाजवादी भाषा अमेरिका करायला लागली. काँग्रेसची हायकमांडही बदलली. मात्र, विद्वानांना या बदलाची चाहूल लागलेली नाही. जुन्याच सुपारीला जागून ते आजही लिखाण करत असतात.

courtesy: Maharashtra Times http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4390124.cms

Wednesday, April 1, 2009

New leader for the India!

These are the days of election fever and every politician is suffering from it. Many have started showing the symptoms of the high fever, you might have observed some ads flooding the web saying “XYZ for PM”. And I feel sad for it, because this thing once again proves that we Indians always try to blindly copy things from west or make something which is somehow an Indian version of an American thing.
Complete post at pimpalepatil